Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Strike : तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद!

Bank Strike : तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद!

Bank Strike : बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात  (Bank Privatization) बँक संघटनांनी (Bank Unions) पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:50 PM2021-12-11T19:50:15+5:302021-12-11T19:50:57+5:30

Bank Strike : बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात  (Bank Privatization) बँक संघटनांनी (Bank Unions) पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

bank strike dec 2021 banking to be closed on four days in coming week due to these reasons | Bank Strike : तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद!

Bank Strike : तातडीने उरकून घ्या महत्त्वाची कामं, पुढील आठवड्यात बँका चार दिवस राहणार बंद!

Bank Strike Dec 2021: तुम्हालाही पुढच्या आठवड्यात काही बँकिंग  (Banking) काम असेल, तर सुरुवातीच्या दिवसातच ते निपटून घ्या. कारण पुढील आठवड्यात चार दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. यामध्ये बँक संपामुळे (Bank Strike) दोन दिवस बंद राहणार आहे.

बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात  (Bank Privatization) बँक संघटनांनी (Bank Unions) पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या दोन दिवसीय संपामुळे पुढील आठवड्यात 16 डिसेंबर (गुरुवार) आणि 17 डिसेंबरला (शुक्रवार) बँकांच्या शाखा बंद राहणार आहेत. याशिवाय, 19 डिसेंबरला रविवारच्या सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. अशा प्रकारे पुढील आठवड्यात देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत.

बँकांच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्ट्याही (Regional Holiday) दिल्या जातात. पुढील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 डिसेंबरला यू सोसो थामचा (U SoSo Tham) वर्धापन दिन आहे. त्यामुळे मेघालयातील (Meghalaya)बँकांचे कामकाज शनिवारी बंद राहणार आहे. पुढील आठवड्यात देशभरातील बँका तीन दिवस बंद राहणार आहेत, मात्र स्थानिक सुट्ट्यांमुळे मेघालयातील बँका चार दिवस बंद राहणार आहेत.

येत्या आठवड्यात महिन्याचा तिसरा शनिवार आहे. त्यामुळे मेघालय वगळता देशाच्या इतर सर्व भागात शनिवारी बँका सुरू राहणार आहेत. याशिवाय आठवड्याचे पहिले तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी बँका सामान्य कामकाज करतील. अशा परिस्थितीत आठवड्याच्या सुरुवातीला बँकिंगशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे पटकन उरकून घ्या. अन्यथा नाहक त्रास होऊ शकतो.

या सेवांवर परिणाम होणार नाही
ऑनलाइन बँकिंग (Online Banking) व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. सर्व बँकांच्या डिजिटल बँकिंग सेवा (Digital Banking), इंटरनेट बँकिंग (Internet Banking), यूपीआय आधारित सेवा (UPI), मोबाईल बँकिंग  (Mobile Banking) इत्यादी सामान्य पद्धतीने कार्य करतील. तसेच, संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आठवडाभरात एटीएममधून (ATM) पैसे काढताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बँकांनी बंदोबस्त सुरू केला आहे. यासाठी एटीएममध्ये रोखीची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत.

Web Title: bank strike dec 2021 banking to be closed on four days in coming week due to these reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.