Join us

Bank Strike in February 2022: बँकांच्या दोन दिवसांच्या संपाबाबत मोठी घडामोड; पुढे ढकलला, जाणून घ्या कधी असेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 6:29 PM

Bank Strike in February 2022 Postpone: खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसीय संपावर जाणार होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ही माहिती दिली होती.

देशभरातील बँका या महिन्यात दोन दिवस संपामुळे बंद राहणार होत्या. बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला होता. परंतू या संपाबाबत मोठी अपडेट आली आहे. करोडो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसीय संपावर जाणार होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ही माहिती दिली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. यामुळे या संघटनांनी संप पुकारला होता. 

परंतू तुर्तास हा संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे नेहमीप्रमाणे 23 आणि 24 फेब्रुवारीला बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. आता हा संप पुढे ढकलण्यात आला असून याच्या तारखा मार्चमध्ये जाहीर करण्यात येतील असे कर्मचारी संघटनांनी सांगितले आहे.

खाजगीकरणापूर्वी कर्मचाऱ्यांचे काय?मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाजगीकरणापूर्वी या बँका आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) घेऊ शकतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय आहे.

'या' दिवशी बँका बंद राहणार; आरबीआयनुसार सुट्ट्यांची यादी!12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार13 फेब्रुवारी : रविवार15 फेब्रुवारी : मोहम्मद हजरत अली जन्मदिवस/लुई-नगाई-नी (इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद)16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यामध्ये बँका बंद)19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)20 फेब्रुवारी: रविवार26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार27 फेब्रुवारी : रविवार

टॅग्स :बँकसंप