नवी दिल्लीः महाराष्ट्रातील बँकां(PSU Banks) चं वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. बँकांचा वेळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतो. पण पैशांच्या देण्या-घेण्याचे व्यवहार दुपारी 3.30वाजेपर्यंतच होत होते. बँकांचं नवं वेळापत्रक बँकर्स कमिटी (Bankers Committee)नं तयार केलं आहे. केंद्रीय आर्थिक मंत्रालयानं बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी बँकाच्या कामकाजाचा वेळ वेगवेगळा असायचा. नव्या वेळापत्रकानुसार बँक सकाळी 9 वाजता उघडतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील. तर काही बँकांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बँकांच्या कमर्शियल एक्टिविटी (Banks Commercial Activity)च्या वेळात बदल करण्यात आला असून, आता बँका सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, संध्याकाळी 6 वाजता बंद होणार आहेत.तर काही बँकांची कमर्शियल एक्टिव्हिटीची वेळ सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठरवण्यात आली आहे. इतर भागात बँकिंग कामकाज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. त्यानुसार, सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दुसरा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आणि तिसरा पर्याय सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा वेळांत बँक ग्राहकांसाठी खुली करावी. त्यानंतर, सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेबाबत निश्चित करण्यात आल्याचे समजते. याबाबतची सर्वच सरकारी प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ जिल्हास्तरावरील समन्वय समित्यांनी तीनपैकी एक वेळ निश्चित करायचा आहे.
1 नोव्हेंबरपासून बदलणार बँक उघडणं अन् बंद होण्याचे नियम, जाणून घ्या नवं वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 1:34 PM