केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली असून, त्याविरोधात देशातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने याबाबतची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे बँकिंग लॉ विधेयक २०२१लाही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याला या कामगार संघटनांमार्फत विरोध होत आहे. या विरोधामध्ये हा दोन दिवसांचा संप करण्यात येत आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते, मात्र कर्मचाऱ्यांनी ते धुडकावले आहे.
बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीचे संयोजक बी. रामबाबू यांनी सांगितले की, सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वापर करून खासगी उद्योगांना पॅकेजच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. येस बँक व आयएल ॲण्ड एफ एस यासंस्थांना सरकार मदत देत आहे, त्यालाही या संघटनांचा विरोध आहे. याशिवाय देशातील १३ कंपन्यांकडे थकीत असलेल्या ४.१६ लाख कोटी रुपयांपैकी २.८५ लाख कोटींची थकबाकी अद्यापही आहे. ती वसूल करण्यास प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Bank Workers Strike : उद्यापासून दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप
बँकांच्या खासगीकरणास विरोध.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:37 AM2021-12-15T11:37:02+5:302021-12-15T11:37:21+5:30