Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकेतर वित्तीय कंपन्यांना फटका

बँकेतर वित्तीय कंपन्यांना फटका

भारतातील बँकेतर आर्थिक कंपन्यांच्या (नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज-एनबीएफसी) मालमत्तेची गुणवत्ता येत्या १२ महिन्यांत स्थिर राहण्याचे भाकीत असून त्यासाठी जास्तीच्या

By admin | Published: October 10, 2015 03:20 AM2015-10-10T03:20:42+5:302015-10-10T03:20:42+5:30

भारतातील बँकेतर आर्थिक कंपन्यांच्या (नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज-एनबीएफसी) मालमत्तेची गुणवत्ता येत्या १२ महिन्यांत स्थिर राहण्याचे भाकीत असून त्यासाठी जास्तीच्या

Banker Financial Companies Shot | बँकेतर वित्तीय कंपन्यांना फटका

बँकेतर वित्तीय कंपन्यांना फटका

नवी दिल्ली : भारतातील बँकेतर आर्थिक कंपन्यांच्या (नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज-एनबीएफसी) मालमत्तेची गुणवत्ता येत्या १२ महिन्यांत स्थिर राहण्याचे भाकीत असून त्यासाठी जास्तीच्या भांडवलाच्या तरतुदीमुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो, असे मुडीज् इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने शुक्रवारी म्हटले.
मुडीजचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ कर्ज अधिकारी श्रीकांत वाडलामणी म्हणाले की,‘‘थकलेल्या कर्जाची ओळख पटण्यासाठी दिवसेंदिवस कठोर होत चाललेल्या नियमांमुळे बँकेतर आर्थिक कंपन्यांसाठीही किमान निकष हे बँकांसारखेच होतील व ही बाब त्यांच्यासाठीच सकारात्मक असेल.’’ बँकेतर आर्थिक कंपन्यांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची मुडीज यांना आशा आहे. मात्र नव्या नियमांनंतर थकलेल्या कर्जाचे प्रमाण वाढू शकते. थकलेले कर्ज कसे ओळखायचे याच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर बँकेतर आर्थिक कंपन्या इतर बँकांच्या बरोबरीने येतील व येत्या काळात थकलेल्या कर्जाच्या प्रमाणात ०.८० ते १.०० टक्के वाढ होऊ शकते. थकलेल्या कर्जाच्या नियमांचे कठोर पालन करण्यासाठी जास्तीच्या भांडवलाच्या तरतुदीमुळे मालमत्तांमध्ये होणारा लाभ ०.२० ते ०.३० टक्के कमी होऊ शकतो.

Web Title: Banker Financial Companies Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.