सध्याच्या काळात कुठल्याही बँकेमध्ये खातं उघडणं अगदी सहजसोपं झालं आहे. त्यामुळे अनेकदा लोक आवश्यक नसतानाही बँक खातं उघडून ठेवतात. अशा परिस्थितीत अनेकांकडे एकापेक्षा अधिक बँक खाती असतात. काही जण या बँक खात्यांचा नियमितपणे वापर करतात. मात्र अनेकांना एकाच वेळी अनेक बँक खाती हाताळता येत नाहीत. त्यांची एक किंवा दोन बँक खातीच सक्रीय असतात.
जर तुमच्याकडेही एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही बराचकाळ तुमच्या बँक खात्यामधून व्यवहार करत नाही तेव्हा तुमचं बँक खातं हे निष्क्रिय असल्याचं घोषित केलं जातं. त्यानंतर बँक हे खातं बंद करू शकतं.
जर तुम्ही कुठल्याही बँकेच्या खात्यावरून काही महिन्यांपर्यंत कुठलाही व्यवहार केला नाही तर तुमचं बँक खातं हे निष्क्रिय असल्याचं घोषित केलं जातं. तसेच दोन वर्षांपर्यंत कुठलाही व्यवहार न केल्यास बँक तुमचं खातं स्वत:च बंद करते. जर तुम्हाला कुठल्या बँक खात्याची आवश्यकता नसल्यास तुम्ही स्वत: बँकेत अर्ज करून हे खाते बंद करू शकता. जर तुम्हाला ते खाते सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला त्यातून नियमित व्यवहार करावे लागतील.
जेव्हा तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाता तेव्हा तुमची बँकही बदलते. त्यामुळे तुमचं जुनं बँक खातं हे व्यवहार न केल्यामुळे इनअॅक्टिव्ह होते. त्यानंतर हे खातं पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर तुमचं बँक खातं पुन्हा सुरू होतं.
जर तुम्ही तुमच्या कुठल्याही बँक अकाऊंटमध्ये ते तुमच्या होम ब्रँचपासून दूर असल्याने देवणा घेवाण करू शकत नसाल तर त तुम्ही ते खाते तुमच्या घराजवळच्या कुठल्याही ब्रँचमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधीच्या होम ब्रँचमध्ये जाऊन अकाऊंट ट्रान्सफरसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुमचं बँक खातं जवळच्या ब्रँचमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. तर तुम्ही सहजपणे देवाणघेवाण सुरू ठेऊ शकाल.