Lokmat Money > बिझनेस न्यूज > भूविकास बँकेचा व्याजदर अवैध सावकारांनाही लाजविणारा

भूविकास बँकेचा व्याजदर अवैध सावकारांनाही लाजविणारा

भूविकास बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या दीर्घमुदती कर्जावर तब्बल ४२ टक्के व्याज आकारले जात असून हा दर अवैध सावकारांनाही लाजविणारा आहे.

By admin | Published: March 18, 2015 01:48 AM2015-03-18T01:48:21+5:302015-03-18T01:48:21+5:30

भूविकास बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या दीर्घमुदती कर्जावर तब्बल ४२ टक्के व्याज आकारले जात असून हा दर अवैध सावकारांनाही लाजविणारा आहे.

Banking interest rate for landowners | भूविकास बँकेचा व्याजदर अवैध सावकारांनाही लाजविणारा

भूविकास बँकेचा व्याजदर अवैध सावकारांनाही लाजविणारा

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
भूविकास बँकेने शेतकऱ्यांना दिलेल्या दीर्घमुदती कर्जावर तब्बल ४२ टक्के व्याज आकारले जात असून हा दर अवैध सावकारांनाही लाजविणारा आहे. या व्याजदराने शेतकऱ्यांनी मूळ रकमेच्या चौपट कर्ज भरल्यानंतरही शेतकरी थकबाकीदार आहेत. अशा स्थितीत भूविकास बँकेने कर्ज वसुलीची तयारी चालविली आहे. यामुळे दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांवर पुन्हा संक्रांत ओढवणार आहे.
सहकार कायदा १९४९ नुसार भूविकास बँकेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी बँकेला कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकिंग लायसन्सची आवश्यकता नव्हती. अधिनियम १९६१ च्या कलम ४४ क नुसार ४२ टक्के व्याज आकारण्याची मुभा देण्यात आली. हा शेतकरी विरोधी कायदा ५४ वर्षानंतरही कायम आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या माथ्यावर तो कायम आहे. कर्जाच्या चौपट रकमेची परतफेड केल्यानंतरही शेतकऱ्यांवर कर्जाचे ओझे कायमच राहिले आहे. दुष्काळी परिस्थितीतही भूविकास बँक शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीच्या स्थितीत आहे.
भूविकास बँकेच्या थकीत कर्जासाठी कठोर नियम आहेत. मूळ कर्जावर व्याजदर १७.५० टक्के आहे. कर्ज थकीत राहिल्यास व्याज आणि मुद्दलावर पुन्हा १७.५० टक्के व्याज आकारण्यात येते. दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास त्यावर ३ टक्के दंड आणि ३.५० टक्के सरचार्ज आकारण्यात येतो. त्यानंर २ टक्के वसुली खर्च ही घेण्यात येतोे. या वसूली खर्चात वाहनाचे पेट्रोेल आणि नोटीस बजावतानाचा खर्चाचा समावेश असतो. अशा प्रकारे मुळ कर्जावर आकारले जाणारे संपूर्ण व्याज ४२ टक्केच्या घरात पोहोचते.
हे घ्या पुरावे....
बाभुळगाव तालुक्यातील वेणी कोठा येथील शेतकरी सदानंद चव्हाण यांनी १९९२ साली ट्रॅक्टरसाठी दोन लाख २३ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्याच्या मोबदल्यात त्यांनी २००० पर्यंत ५ लाख ७२ हजार रूपयांच्या कर्जाची परतफेड केली. यानंतरही दीड लाख रूपयांचे कर्ज कायम आहे. यातून शेतकरी हादरला. त्याने आपली शेती कसणे सोडून दिले. आता हा शेतकरी यवतमाळात कॅन्टीन चालवितो.
बोथबोडनचे शेतकरी राघोबा डोळे यांनी भूविकास बँकेकडून २ लाख ३९ हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यांनी ५ लाख ६४ हजाराची परतफेड केली. आज त्यांच्यावर ४ लाख १० हजार रूपयांची थकबाकी कायम आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने घेतलेले ट्रॅक्टर चोरीला गेले. याची पोलिसात रीतसर तक्रार केली. बँकेलाही कळविले. यानंतरही त्याला नोटीस बजावण्यात आली होती. आता या शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील शिवशंकर अरगेला याने १ लाख ९० हजार रूपयाचे कर्ज उचलले होते. १ लाख ४० हजाराची परतफेड केली. त्याच्यावर ९ लाख ३४ हजार रूपयांची थकबाकी आहे.
यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्याच करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इतर शेतकऱ्यांनी समजूत घातल्याने हा अनर्थ टळला.

शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांनी भूविकास बँक कर्जमुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहिले आहे.

थकबाकी ५८१ कोटी, व्याजमाफी ५०० कोटी
च्बँकेच्या ४२ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांपुढे नवा पेच निर्माण केला आहे. शेतकऱ्यांकडे ५८१ कोटींची थकबाकी होती. शासनाच्या व्याजमाफीतून ५०० कोटींची रक्कम भूविकासकडे वळती झाली. यानंतर ८१ कोटी रूपयांची परतफेड बाकी होती.
च्शेतकऱ्यांचे शेअर्स रूपात हे पैसे बँकेकडे जमा आहेत. मात्र ४२ टक्के व्याजदाराने ३५० कोटी रूपयांची थकबाकी शेतकऱ्यांवर कायम राहीली आहे. शासनाने आजपर्यंत भूविकास बँकेला १९०० कोटी दिले. यानंतरही कर्ज कायम आहे. आता बँका शेतकऱ्यांकडून एकमुस्त वसुली करणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा मोठा धसका घेतला आहे.

शेतकऱ्यांचे नावकर्ज घेतलेपरतफेडथकबाकी
शकुंतला वाघ (यवतमाळ)२.६० लाख६.३४ लाख३.३५ लाख
जितेन्द्र गुल्हाणे (यवतमाळ)३.३ लाख६.४५ लाख१.८५ लाख
अनिल पाटील (यवतमाळ)३.१६ लाख७.१८लाख५.१४ लाख
पुरूषोत्तम इंगळे (वर्धा )२.९१लाख६.०९लाख२.९१ लाख
शिवशंकर अरगेला (गडचिरोली)१.९० लाख१.४३लाख९.३४ लाख
देवानंद बारई (भंडारा) २.४० लाख४.८१ लाख४ लाख

भूविकास बँकेच्या दीर्घ मुदती कर्जामध्ये सहकारातील दामदुप्पट अट लागू पडत नाही. एक लाखावरील कर्ज प्रकरणात वेगळा व्याजदर आहे. थकीत कर्ज, त्यावर दंड, सरचार्ज, वसुली खर्च आकारला जातो. कर्ज किती जुने आहे यावर व्याजाचे दर ठरतात. २००६ च्या व्याजमाफीनंतर मुद्दल आणि व्याजाचे चार हप्ते पडले आहेत. त्यानुसार कर्जाच्या वसुलीचे वर्गीकरण करण्यात आले.
- शिवाजी चौधरी, सहायक अवसायक, भूविकास बँक, यवतमाळ

Web Title: Banking interest rate for landowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.