ए. के. हिरवे : राज्य वाणिज्य परिषदेचा समारोपपुणे : भारतासारख्या विकसनशील देशासमोर बॅकींग क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. जागतिकीकरणातून निर्माण होणार्या समस्या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे बॅकींग व्यवस्थापनाला नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. ए. के. हिरवे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य विभाग आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने वाघोली येथे आयोजित २६ व्या महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि डॉ. माधव तल्हार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. वाल्मिक सरोदे यांना तर रमण परशुराम उत्कृष्ट लेखनासाठीचा पुरस्कार प्राचार्य डॉ. प्रकाश सोमलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. शेजवलकर, उच्च शिक्षणचे विभागीय सहसंचालक डॉ. सुनील शेटे, वर्ल्ड ट्रेड सेंटर (मुंबई) चे डॉ. विवेक सोनवणे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तल्हार, अध्यक्ष डॉ. बबन तायवडे, डॉ. गणपत शितोळे, डॉ. टी. ए. शिवारे, संयोजन सचिव प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संजय कप्तान, शांतिलाल बोरा प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, प्रा. बळवंत लांडगे आदी उपस्थित होते.डॉ. हिरवे म्हणाले, बँकींग क्षेत्राला व्यवस्थापनातील आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या क्षेत्राला पूरक असणारी कौशल्ये आत्मसात करावीत. विद्यार्थी हा केवळ शिक्षित न होता तो रोजगाराभिमुख होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल ही काळाची गरज आहे. आर्थिक आणि शैक्षणिक सहभागाचे धोरण हे भारतास महासत्ता बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. वाणिज्य शाखेत पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग वाढावा. याकरिता आपल्या शहरातील बाजारपेठा, शेअर मार्केट, आठवडे बाजार इतकेच नव्हे तर आपल्या संपकार्तील प्रत्येक माणूस आपण वाचायला हवा. तरच कॉमर्सचे अध्ययन आणि अध्यापन हे जीवंत ठरेल, असे डॉ. शेजवलकर यांनी नमुद केले.डॉ. सिध्देश्वर गायकवाड आणि प्रा. माधुरी देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.--------------
बँकिंग व्यवस्थापनाला नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज
ए. के. हिरवे : राज्य वाणिज्य परिषदेचा समारोप
By admin | Published: February 8, 2015 11:40 PM2015-02-08T23:40:34+5:302015-02-08T23:40:34+5:30