Lokmat Money > बिझनेस न्यूज > Banking: मुलांच्या नावावर आजच उघडा हे स्पेशल खातं, आयुष्यभर भासणार नाही पैशांची कमतरता  

Banking: मुलांच्या नावावर आजच उघडा हे स्पेशल खातं, आयुष्यभर भासणार नाही पैशांची कमतरता  

Banking: जर तुम्ही कुठल्या मुलांचे आई-वडील असाल तर आतापासूनच त्यांच्या भविष्याविषयी योजना आखण्यास सुरुवात करा. हो. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याचा जमाना आता इतिहासजमा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 04:04 PM2023-04-26T16:04:48+5:302023-04-26T16:05:09+5:30

Banking: जर तुम्ही कुठल्या मुलांचे आई-वडील असाल तर आतापासूनच त्यांच्या भविष्याविषयी योजना आखण्यास सुरुवात करा. हो. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याचा जमाना आता इतिहासजमा झाला आहे.

Banking: Open this special account in the name of children today, you will not face shortage of money for life | Banking: मुलांच्या नावावर आजच उघडा हे स्पेशल खातं, आयुष्यभर भासणार नाही पैशांची कमतरता  

Banking: मुलांच्या नावावर आजच उघडा हे स्पेशल खातं, आयुष्यभर भासणार नाही पैशांची कमतरता  

जर तुम्ही कुठल्या मुलांचे आई-वडील असाल तर आतापासूनच त्यांच्या भविष्याविषयी योजना आखण्यास सुरुवात करा. हो. मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी पैसे जमा करण्याचा जमाना आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे मुलांचा वाढदिवस किंवा कुठल्यातरी खास प्रसंगी स्पेशल फिचर असलेलं बँक अकाउंट तुम्ही मुलांना गिफ्ट करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून लहान मुलांसाठी स्पेशल फीचर असलेलं बँक अकाऊंट सादर कऱण्यात आलं आहेत. या माध्यमातून तुम्ही मुलांचं खातं उघडून त्यामध्ये सेव्हिंग करू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडणाऱ्या या खात्यामध्ये पेमेंट ट्रान्सफर करण्याचीही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या फिचरमुळे मुलांना अवास्तव खर्च करता येणार नाही. एसबीआय अल्पवयीन मुलांसाठी दोन विशेष फीचर अकाऊंट उपलब्ध करून देत आहे. त्या अंतर्गत तुम्ही पहिलं पाऊल आणि दुसरं पहिली उडाण ही दोन खाती उघडू शकता.  

पहला कदम बँक अकाऊंट 
एसबीआयच्या या खात्यामध्ये अनेक प्रकारचे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कुठल्याही वयाच्या अल्पवयीन मुलांसोबत त्यांचे आई-वडील जॉईंट अकाऊंट उघडू शकतात. हे खाते पालक किंवा मुल स्वत: चालवू शकते. यामध्ये खातं उघडल्यावर एटीएमसुद्धा दिलं जातं. एटीएम कार्ड अल्पवयीन मुल आणि त्याच्या पालकांच्या नावावर असतं. या खात्यामधून ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. तसेच या खात्यामधून दररोज दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता.

पहली उडान खात्याचे फायदे 
या योजनेंतर्गत १० वर्षांहून अधिक वयाच्या मुलांचं खातं उघडलं जातं. या खात्यामध्ये त्यांची सही असणं आवश्यक असतं. हे खाते मुलं स्वत:च चालवू शकतात. यात मुलांना एटीएम कार्डची सुविधाही मिळते. यामधून दररोज ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही दररोज २ हजार रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता.  

Web Title: Banking: Open this special account in the name of children today, you will not face shortage of money for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.