मुंबई - सर्वच क्षेत्रांत झपाट्याने तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांचा कौशल्य विकास होणे गरजेचे आहे. पण समाजातील गरीब व होतकरू तरुण या कौशल्यापासून वंचित असतात. दारिद्र्यरेषेखालील हे तरुणसुद्धा आता बँकिंग व विमा क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.
भारत २०२०पर्यंत जगातील सर्वाधिक तरुण देश असेल. या तरुणांना रोजगारक्षम होण्याची गरजही असेल. त्यासाठी केंद्र सरकारच्या राष्टÑीय कौशल्य विकास महामंडळाने (एनएसडीसी) पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत महामंडळ आता दारिद्र्यरेषेखालील तरुणांनाही प्रशिक्षित करणार आहे. त्यासाठी त्यांनी दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनशी सहकार्य करार केला.
मोबाइल बँकिंग आणि डिजिटायझेशनमुळे आर्थिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. याचा मोठा परिणाम बँकिंग, आर्थिक सेवा व विमा (बीएफएसआय) क्षेत्रावर होणार आहे. त्यासाठीच एनएसडीसीने मुंबईत सुरू केलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रात ‘बीएफएसआय’ या श्रेणीतील कौशल्य विकासावर ‘फोकस’ करण्यात आला आहे. या केंद्रात आता दरवर्षी ८०० गरीब व होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याद्वारे समाजातील तळागाळातील तरुण अत्याधुनिक रोजगारासाठी तयार होऊ शकणार आहेत. याबाबत एनएसडीसीचे सीईओ मनिष कुमार म्हणाले, महामंडळाने सध्या महिला व गरीब तरुण-तरुणींना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा वर्ग समाजात सर्वाधिक असल्याने त्यांना प्रशिक्षण दिल्यास देशाच्या दीर्घकालिन व स्थिर विकासाची खात्री मिळू शकेल. या उपक्रमासाठी खासगी क्षेत्राचे सहकार्य मोलाचे असेल.
डीएचएफएलचे वरिष्ठ उपाध्यक्ष एस. गोविंदन म्हणाले, आर्थिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात रोजगारांची गरज वाढती असेल. दारिद्र्यरेषेखालील तरुण त्यापासून वंचित राहू नये, असा डीएचएफएलचाही प्रयत्न आहे.
गरीब तरुणांना बँकिंगचे प्रशिक्षण, मुंबईत अत्याधुनिक केंद
सर्वच क्षेत्रांत झपाट्याने तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांचा कौशल्य विकास होणे गरजेचे आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:43 AM2018-08-16T04:43:06+5:302018-08-16T04:43:25+5:30