Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशभरात बँकिंग व्यवहार ठप्प! सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर, एटीएमबाहेर रांगा

देशभरात बँकिंग व्यवहार ठप्प! सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर, एटीएमबाहेर रांगा

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप पाळला. त्यामुळे देशभरातील बँकिंग व्यवहार ठप्प झाले. बँकांच्या प्रस्तावित एकीकरणाला विरोध करण्यासाठी, तसेच अन्य काही मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 05:32 AM2017-08-23T05:32:00+5:302017-08-23T05:32:00+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप पाळला. त्यामुळे देशभरातील बँकिंग व्यवहार ठप्प झाले. बँकांच्या प्रस्तावित एकीकरणाला विरोध करण्यासाठी, तसेच अन्य काही मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.

Banking transaction jam nationwide! Public Sector Bank employees strike on strike, outside the ATM | देशभरात बँकिंग व्यवहार ठप्प! सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर, एटीएमबाहेर रांगा

देशभरात बँकिंग व्यवहार ठप्प! सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर, एटीएमबाहेर रांगा

नवी दिल्ली/मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप पाळला. त्यामुळे देशभरातील बँकिंग व्यवहार ठप्प झाले. बँकांच्या प्रस्तावित एकीकरणाला विरोध करण्यासाठी, तसेच अन्य काही मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.
आजच्या संपामुळे पैशांचा भरणा, पैसे काढणे, धनादेशांचे क्लिअरन्स, एनईएफटी आणि आरटीजीएस या सेवा ठप्प झाल्या. खाजगी बँकांचे व्यवहार मात्र नियमित सुरू असल्याचे दिसून आले. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक या खाजगी बँका सुरू होत्या. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए) या संघटनेने ग्राहकांना संपाची आधीच कल्पना दिली होती. संपामुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असे संघटनेने म्हटले होते, तसेच बँकांना आगाऊ उपाययोजना करण्यास सांगितले होते.
बँकिंग क्षेत्रातील विविध संघटनांची शिखर संघटना युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप करण्यात आला. या संघटनेचे १0 लाख सदस्य आहेत, तसेच नऊ संघटना सहभागी आहेत. आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्स यांचा त्यात समावेश आहे.
नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्स या संघटनेचे उपाध्यक्ष अश्वनी राणा यांनी सांगितले की, विलीनीकरण आणि अधिग्रहण याद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकीकरण करून बँकांची संख्या १0 ते १५ वर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठी हा संप करण्यात आला. संपकºयांच्या अन्य मागण्यांत कंपन्यांना देण्यात आलेले कर्ज एनपीएत गेल्यास त्यासाठी कर्जमाफी देण्यात येऊ नये, हेतूत: कर्ज न फेडणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. नोटाबंदीच्या काळात बँक कर्मचाºयांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची मागणीही कर्मचाºयांनी केली.
बिहारमधील बिहार बँक युनियन ही संघटनाही संपात सहभागी होती. संपामुळे बिहारातील बँकिंग व्यवहार ठप्प झाले. प. बंगालमधील बँकिंग व्यवहार पूर्णत: ठप्प झाल्याचा दावा संपकºयांनी केला. त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश येथील बँकिंग व्यवहारांवरही परिणाम झाला.

आझाद मैदानात आले सर्व
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, राज्यातील २२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह ४ जुन्या खासगी बँका, २ प्रादेशिक ग्रामीण बँका यांमधील १० हजार शाखा संपामुळे बंद होत्या. त्यामुळे बँकांचे दरवाजेच उघडले नसल्याने त्यामधील ४० हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी संपात सामील झाले.
विविध बँकांचे एटीएम सकाळी काही प्रमाणात सुरू होते.मात्र काही तासांतच रोखीचे व्यवहारही ठप्प पडले. सरकारचे व्यवहार होत असलेल्या स्टेट बँकेतील कर्मचाºयांनी १०० टक्के व्यवहार बंद ठेवल्याने सरकारचे कामही बंद पडल्याचा दावा तुळजापूरकर यांनी केला आहे. संपामध्ये उतरलेले शेकडो बँक कर्मचारी व अधिकारी सकाळी आझाद मैदानात जमले होते.

Web Title: Banking transaction jam nationwide! Public Sector Bank employees strike on strike, outside the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.