Lokmat Money > बिझनेस न्यूज > डिजिटल होतोय भारत ?  तीन महिन्यांत बँकांनी बंद केले 358 एटीएम

डिजिटल होतोय भारत ?  तीन महिन्यांत बँकांनी बंद केले 358 एटीएम

यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. अशारितीने एटीएमची संख्या 0.16 टक्के कमी झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 11:52 AM2017-10-28T11:52:44+5:302017-10-28T11:58:12+5:30

यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. अशारितीने एटीएमची संख्या 0.16 टक्के कमी झाली आहे

Banks closed 358 ATMs in three months | डिजिटल होतोय भारत ?  तीन महिन्यांत बँकांनी बंद केले 358 एटीएम

डिजिटल होतोय भारत ?  तीन महिन्यांत बँकांनी बंद केले 358 एटीएम

नवी दिल्ली - भारतीय कॅशलेस होऊ लागले आहेत का ? ज्याप्रकारे बँका आपले एटीएम बंद करु लागले आहेत, त्यावरुन तरी असंच वाटत आहे. यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. अशारितीने एटीएमची संख्या 0.16 टक्के कमी झाली आहे. तसं पहायला गेल्यास भारतात हा बदल वेगाने झाल्याचं दिसून येतंय, कारण गेल्या चार वर्षात एटीएमच्या संख्येत 16.4 टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र गेल्या एक वर्षात ही वाढ 3.6 टक्क्यांवरच थांबली होती. हे असं पहिल्यांदाच झालं आहे, जेव्हा एटीएमची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे.  

नोटाबंदीनंतर शहरांमध्ये एटीएमचा होणारा कमी वापर आणि ऑपरेशन कॉस्टमध्ये झालेली वाढ यामुळे बँकांना आता एटीएम व्यवस्थेची पुनर्तपासणी करावी लागत आहे. आपल्या देशात भारतीय स्टेट बँकेचं एटीएम नेटवर्क सर्वात मोठं आहे. जून महिन्यात एसबीआयच्या देशभरातील एटीएमची संख्या  59,291 इतकी होती, जी ऑगस्ट महिन्यात कमी होऊन 59,200 झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या एटीमची संख्या 10,502 वरुन 10,083 वर आली आहे. खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक एचडीएफसीच्या एटीएमची संख्या 12,230 वरुन कमी होऊन 12,225 झाली आहे. 

बँकांचं म्हणणं आहे की, 7x5 स्क्वेअर फूटाच्या एटीएम केबिनचं एअरपोर्ट आणि मुंबईतील प्राइम लोकेशनवर मासिक भाडं किमान 40 हजार रुपये असतं. चेन्नई आणि बंगळुरुसारख्या मेट्रो शहरांमध्ये एटीएम साइटचं भाडं 8000 ते 15,000 पर्यंत पोहोचलं आहे. याशिवाय सेक्युरिटी स्टाफ, एटीएम ऑपरेटर्स, मेन्टेनन्स चार्ज आणि वीजबिल मिळवून एका एटीएमचा पुर्ण खर्च एक लाखापर्यंत पोहोचतो. खासकरुन एटीएम केबिनमध्ये वीज प्रचंड खर्च होते. पुर्ण दिवसभर केबिनमधील तापमान 15 ते 18 डिग्री सेल्सिअस ठेवायचं असल्या कारणाने विजेवर प्रचंड खर्च होतो. 

एसबीआयच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या काही सहकारी बँकांच्या विलनीकरणानंतर काही एटीएम बंद करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितलं की, 'एखाद्या एटीएमवर होणारा खर्च योग्य होता का यासंबंधी आम्हाला निर्णय घ्यायचा होता. आम्ही ते एटीएम बंद केले आहेत, जिथे 500 मीटर अंतरापर्यंत एसबीआयचं दुसरं एटीएम होतं. यामुळे आमच्या ग्राहकांना असुविधा होणार नाही'. इतर बँकांनी आपले एटीएम बंद केले नसले, तरी विस्तार करण्याची योजना तात्पुरती गुंडाळली आहे. 

Web Title: Banks closed 358 ATMs in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.