Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायबर गुन्ह्यामुळे ३ वर्षांत बँकांना ताशी ८८,५५३ रुपयांचा फटका

सायबर गुन्ह्यामुळे ३ वर्षांत बँकांना ताशी ८८,५५३ रुपयांचा फटका

सायबर गुन्हेगारीमुळे गेल्या तीन वर्षांत बँकांना दर तासाला सरासरी ८८,५५३ रुपयांचा फटका बसला. १ एप्रिल २0१४ ते ३0 जून २0१७ या काळात बँकांना २५२ कोटी रुपये गमवावे लागले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:15 AM2017-08-01T01:15:10+5:302017-08-01T01:15:14+5:30

सायबर गुन्हेगारीमुळे गेल्या तीन वर्षांत बँकांना दर तासाला सरासरी ८८,५५३ रुपयांचा फटका बसला. १ एप्रिल २0१४ ते ३0 जून २0१७ या काळात बँकांना २५२ कोटी रुपये गमवावे लागले आहेत.

Banks hit 88,553 rupees in three years due to cybercrime | सायबर गुन्ह्यामुळे ३ वर्षांत बँकांना ताशी ८८,५५३ रुपयांचा फटका

सायबर गुन्ह्यामुळे ३ वर्षांत बँकांना ताशी ८८,५५३ रुपयांचा फटका

बंगळुरू : सायबर गुन्हेगारीमुळे गेल्या तीन वर्षांत बँकांना दर तासाला सरासरी ८८,५५३ रुपयांचा फटका बसला. १ एप्रिल २0१४ ते ३0 जून २0१७ या काळात बँकांना २५२ कोटी रुपये गमवावे लागले आहेत. या रकमेतून ५0,४00 शेतकºयांचे प्रत्येकी ५0 हजार रुपयांचे कर्ज माफ करता आले असते.
या काळात बँकांनी दररोज सरासरी ४0 सायबर गुन्ह्यांची नोंद केली. त्यापोटी बँकांना बसलेला रोजचा फटका २१.२४ लाख रुपयांचा आहे. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या १0२ बँकांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. या काळात एकूण ४६,६१२ गुन्ह्यांची नोंद झाली.
२0१७-१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून) आकड्याच्या विश्लेषणातून दिसून आले की, या काळात रोज सरासरी ५६ सायबर गुन्ह्यांच्या घटना घडल्या. आधीच्या तीन वर्षांत दररोज सरासरी ४0 घटनांची नोंद होत होती. गुन्ह्यांच्या संख्येबरोबरच बँकांना गमवाव्या लागणाºया रकमेतही वाढ झाली आहे. दररोज २१.५७ लाख म्हणजेच तासाला ८९,८८0 रुपये बँका या गुन्ह्यामुळे गमावत आहेत. २३ बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे नोंदविलेल्या घटनांतील ही आकडेवारी आहे.
नेत्रिका कन्सल्टिंग प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक संजय कौशिक यांनी सांगितले की, यातील बहुतांश घोटाळे डेबिट आणि के्रडिट कार्डांशी संबंधित आहेत. यावर आळा घालण्यासाठी बँका आता यंत्रणा उभारत आहेत. आॅनलाइन सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नियमितपणे दिल्या जात आहेत. घोटाळेखोरांपासून वाचण्याकरिता लोकांत जागृती करण्यावरही रिझर्व्ह बँक भर देत आहे.

Web Title: Banks hit 88,553 rupees in three years due to cybercrime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.