नवी दिल्लीः देशातल्या काही बँकांनी मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. बँकांनी 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेनं हे नियम बदलल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. हे शुल्क 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून लागू करण्यात येणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात किमान 2 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे, जे आधी 1,500 रुपये होते. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र - बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आणि बँकेत कमी लोक यावेत, यासाठी बँक सध्या हे सर्व करीत आहे. बँक सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.
अॅक्सिस बँक - अॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. ECS व्यवहारांवर पूर्वी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग फी आकारणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेत बचत आणि कॉर्पोरेट वेतन खातेदारांनी पैसे काढल्यानंतर - कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट कार्ड-एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्यानं व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.
हेही वाचा
जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात....
ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?
गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ
CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू
अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा
चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले