Join us

बँकांकडून ठेवी घेण्यापेक्षा कर्ज देण्याचे प्रमाण अधिक, प्रमाण एकसमान ठेवण्याच्या सक्तीचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 06:55 IST

एक वर्षापासून जमा वृद्धी ही कर्ज वृद्धीच्या तुलनेत अधिक होती.

नवी दिल्ली: शुद्ध व्याज मार्जिनवरील दबावामुळे व्यावसायिक बँकांना कर्ज व ठेवी यांच्या वृद्धीत एकसमानता आणण्याची सक्ती करावी लागू शकते, असे भारतीय रिडाव्र्व्ह बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. 

एक वर्षापासून जमा वृद्धी ही कर्ज वृद्धीच्या तुलनेत अधिक होती. मात्र, चालू वित्त वर्षात २६ जुलैपर्यंत कर्ज वृद्धी आदल्या वर्षाच्या तुलनेत १३.७ टक्के असताना ठेवी वृद्धी १०.६ टक्केच राहिली. 

चालु व बचत खात्यांवर बँकांना कमी व्याज द्यावे लागते, त्यामुळे हे साधन बँकांसाठी कमी खर्चाचे आहे, याचे प्रमाण घटल्यामुळे बँकांना जास्त व्याज द्यावे लागणाऱ्या साधनांचा वापर केला.

नफ्यावर मोठा दबाव रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले की, ठेवींची वृद्धी कमी राहिल्यामुळे एप्रिल ते जून तिमाहीत बँकांना प्रमाणपत्रे, उच्च मूल्याची बचत खाती आणि आवर्ती ठेवी यांच्या माध्यमातून निधी उभा करावा लागला, अहवालानुसार, बँकांकडील एकूण ठेवीत चालू, खाते व बचत खाते यांसारख्या कमी खर्चाच्या ठेवींचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे बँकांच्या नफ्यावर दवाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :बँकव्यवसाय