मुंबई : ऑक्टोबरमध्ये बँकांना जास्त दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे सामान्यांना सुट्यांचे वार लक्षात घेऊनच बँकेची कामे करावी लागणार आहेत. ऑक्टोबरमध्ये बँका २१ दिवस तर राज्यात १० दिवस बँका बंद राहतील.
ऑक्टोबरमध्ये नवरात्र आहे. बिहू, महर्षी वाल्मिकी जयंतीसह इतर सणांमुळे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे देशभरात २१ दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात मात्र १० दिवस बँकांना सुटी असेल. ऑक्टोबरमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि ३ अशा मिळून १० सुट्या आहेत.
पहिल्याच शनिवार, रविवारी सुटी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे महिन्यातील पहिला शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. असे तीन सप्ताहांत बँकांना सुट्टी राहणार आहे. सुट्यांची ही यादी पाहता ग्राहकांना वेळीच बँकेतील व्यवहार करून घेण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
राज्यातील सुट्या
२ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती
३ ऑक्टोबर : रविवार
९ ऑक्टोबर : दुसरा शनिवार
१० ऑक्टोबर : रविवार
१५ ऑक्टोबर : दसरा
१७ ऑक्टोबर : रविवार
१९ ऑक्टोबर : ईद-ए-मिलाद
२३ ऑक्टोबर : चौथा शनिवार
२४ ऑक्टोबर : रविवार
३१ ऑक्टोबर : रविवार