Join us

बँकांना मिळणार सुट्यांचा बोनस; ऑक्टोबरमध्ये राज्यात १० दिवस व्यवहार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 5:38 AM

इतरत्र मिळून २१ दिवस ऑक्टोबरमध्ये २१ दिवस कामकाज राहणार बंद.

ठळक मुद्देइतरत्र मिळून २१ दिवस ऑक्टोबरमध्ये २१ दिवस कामकाज राहणार बंद.

मुंबई : ऑक्टोबरमध्ये बँकांना जास्त दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे सामान्यांना  सुट्यांचे वार लक्षात घेऊनच बँकेची कामे करावी लागणार आहेत. ऑक्टोबरमध्ये बँका २१ दिवस तर राज्यात १० दिवस बँका बंद राहतील.

ऑक्टोबरमध्ये नवरात्र आहे. बिहू, महर्षी वाल्मिकी जयंतीसह इतर सणांमुळे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी आहे.   त्यामुळे देशभरात २१ दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात मात्र १० दिवस बँकांना सुटी असेल. ऑक्टोबरमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि ३ अशा मिळून १०  सुट्या आहेत.

पहिल्याच शनिवार, रविवारी सुटी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे महिन्यातील पहिला शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. असे तीन सप्ताहांत बँकांना सुट्टी राहणार आहे. सुट्यांची ही यादी पाहता ग्राहकांना वेळीच बँकेतील व्यवहार करून घेण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

राज्यातील सुट्या२ ऑक्टोबर     : महात्मा गांधी जयंती३ ऑक्टोबर     :  रविवार९ ऑक्टोबर     : दुसरा शनिवार१० ऑक्टोबर  : रविवार१५ ऑक्टोबर  : दसरा१७ ऑक्टोबर : रविवार१९ ऑक्टोबर  : ईद-ए-मिलाद२३ ऑक्टोबर : चौथा शनिवार२४ ऑक्टोबर : रविवार३१ ऑक्टोबर : रविवार 

टॅग्स :बँकमहाराष्ट्रमहात्मा गांधीभारत