Lokmat Money > बिझनेस न्यूज > एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना

एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना

मोफत एटीएम वापराची मर्यादा संपल्यानंतर खातेधारकांकडून वसूल केल्या जात असलेल्या शुल्कातून स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेची कमाई वाढत चालली आहे.

By admin | Published: June 23, 2016 01:03 AM2016-06-23T01:03:09+5:302016-06-23T01:03:09+5:30

मोफत एटीएम वापराची मर्यादा संपल्यानंतर खातेधारकांकडून वसूल केल्या जात असलेल्या शुल्कातून स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेची कमाई वाढत चालली आहे.

The bank's rich treasure of ATM fees | एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना

एटीएमच्या शुल्काने बँकेचा भरतोय खजिना

इंदूर : मोफत एटीएम वापराची मर्यादा संपल्यानंतर खातेधारकांकडून वसूल केल्या जात असलेल्या शुल्कातून स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेची कमाई वाढत चालली आहे.
२0१५-१६ या वित्तीय वर्षात एटीएम वापरावरील शुल्काने स्टेट बँकेने ३0१.४४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. तो त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा ४७.५ टक्क्यांनी जास्त आहे. मध्य प्रदेशातील नीमच येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकाराखाली याबाबत माहिती मागवली होती. त्यात त्यांना स्टेट बँकेतर्फे ही माहिती देण्यात आली. याबाबत स्टेट बँकेने
२ जून रोजी गौड यांना दिलेल्या उत्तरात स्टेट बँकेने म्हटले आहे की, एटीएम मोफत वापरण्याची मर्यादा संपल्यावर त्याचा वापर केल्याबद्दल २0१४-१५ या वित्तीय वर्षात बँकेला २१0.४७ कोटी रुपयांची कमाई झाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: The bank's rich treasure of ATM fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.