Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांना 'साडेसाती'; वाचा 2011 ते 18 दरम्यान कुणी कुणी घातला किती कोटींचा गंडा

बँकांना 'साडेसाती'; वाचा 2011 ते 18 दरम्यान कुणी कुणी घातला किती कोटींचा गंडा

सार्वजनिक क्षेत्रामधील बँका म्हणजे सर्वसामान्यांचे आपला कष्टाचा पैसा साठवण्याचे हक्काचे ठिकाण. पण गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमधील बँकांमधील घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. गेल्या सात वर्षांत सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर टाकलेली ही नजर.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 04:14 PM2018-02-16T16:14:02+5:302018-02-16T16:14:39+5:30

सार्वजनिक क्षेत्रामधील बँका म्हणजे सर्वसामान्यांचे आपला कष्टाचा पैसा साठवण्याचे हक्काचे ठिकाण. पण गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमधील बँकांमधील घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. गेल्या सात वर्षांत सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर टाकलेली ही नजर.  

Banks like 'Sadeasati'; Read more about who cares about how many crores he has invested in 2011 to 18 | बँकांना 'साडेसाती'; वाचा 2011 ते 18 दरम्यान कुणी कुणी घातला किती कोटींचा गंडा

बँकांना 'साडेसाती'; वाचा 2011 ते 18 दरम्यान कुणी कुणी घातला किती कोटींचा गंडा

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रामधील बँका म्हणजे सर्वसामान्यांचे आपला कष्टाचा पैसा साठवण्याचे हक्काचे ठिकाण. पण गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमधील बँकांमधील घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांची पतही धोक्यात आली आहे.  2011 ते 2018 दरम्यान भारतातील बँकांना धनाढ्य घोटाळेबाजांनी सुमारे 227.43 अब्ज रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आईआईएम) बंगळुरुच्या एका एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सात वर्षांत सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर टाकलेली ही नजर.  

बँकांमध्ये झालेल्या काही मोठ्या घोटाळ्यांची यादी 
1 - 2011 साली बँ.क ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आयडीबीआय बँक या बँकांमध्ये सुमारे दहा हजार खोटी खाती उघडून सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या रकमेची देवाणघेवाण झाल्याचा छडा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनने  (सीबीआय)  लावला होता. 
 2 - 2014 मध्ये फिक्स डिपॉझिटमधील सुमारे 700 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सार्वजनिक क्षेत्रामधील काही अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी नऊ एफआयआर दाखल केल्या होत्या. 
3 - 2014 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाला इलेक्ट्रोथर्म इंडिया नावाच्या कंपनीने  सुमारे 436 कोटींचा चुना लावल्याचे उघडकीस आले होते.
4 - 2014 मध्ये कोलकाता येथील उद्योगपती बिपिन ओहरा याने खोट्या कागदपत्रांच्या मदतीने सुमारे 1400 कोटींचे कर्ज घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याचे समोर आले होते. 
5 - 2014 मध्ये सिंडिकेट बँकेचे माजी चेअरमन आणि एमडी एस. के. जैन यांनी लाच घेऊन 80 अब्ज रुपये दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. 
6 - 2015 साली  जैन इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 212 कोटींचा  घोटाळा केला होता. 
7- 2015 साली विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी फॉरेन एक्स्चेंज मध्ये सुमारे 60 अब्ज रुपयांचा घोटाळा केला. 
8- 2016 मध्ये चार व्यक्तींनी मिळून सिंडिकेट बँकेत 386 खाती उघडून 10 अब्ज रुपयांचा घोटाळा केला. बँकेला गंडा घालण्यासाठी या व्यक्तींनी खोटे चेक, लेटर ऑफ क्रेडिट्स आणि एलआयसी पॉलिसींची मदत घेतली. 
9 - 2017 साली सीबीआयने युनायटेड ब्रुवरीजचा माजी चेअरमन विजय माल्या आणि इतर दहा जणांविरोधात 950 कोटींचे कर्ज परत न केल्या प्रकरणी आरोपपत्र तयार केले.  
 10 - 2017 साली सीबीआयने 11.61 अब्ज रुपयांच्या नुकसानीप्रकरणी पाच सरकारी बँकांविरोधात एफआयआर दाखल केली होती. तसेच डेक्कन क्रॉनिकल आणि 
 11 -  2017 साली सीबीआयने 20 बँकांचे 22.23 अब्ज रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी कोलकाता येथील व्यापारी नीलेश पारेख याला अटक केली. 
 12 - 2017 साली दोन सरकारी बँकांचे 2.9 अब्ज रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अभिजित ग्रुपचे प्रमोटर आणि कॅनरा बँकेचे माजी डीजीएम यांना सीबीआयने अटक केली. 
13 - 2017 साली 836 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे पूर्व विभाग प्रमुख आणि सूरतच्या  लॉजिस्टिक कंपनीच्या निर्देशकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. 
14 - 2018 साली अंमलबजावणी संचलनालयाने आंध्र बँकेच्या डायरेक्टरांना 5 अब्ज रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केली. या घोटाळ्यात गुजरातमधील एक फार्मा कंपनीसुद्धा सहभागी आहे.  
 

Web Title: Banks like 'Sadeasati'; Read more about who cares about how many crores he has invested in 2011 to 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.