Join us

एनपीएसाठी बॅँकांना आणखी सवलत मिळावी : सतीश मराठे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:03 AM

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मराठे यांनी वरील मत व्यक्त केले आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे बॅँकांचा एनपीए वाढण्याची भीती असून, त्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणीही त्यांनी केली.

मुंबई : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेला तीन महिन्यांचा मोरॅटोरिअम पुरेसा नसून तो वाढवावा तसेच बँकांना एनपीएबाबत सवलत मिळावी, अशी मागणी रिझर्व्ह बॅँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सदस्य सतीश मराठे यांनी केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बँकांना भूमिका न ठेवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मराठे यांनी वरील मत व्यक्त केले आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे बॅँकांचा एनपीए वाढण्याची भीती असून, त्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणीही त्यांनी केली.काही पतमापन संस्थांनी पॅकेजच्या तातडीने होणाऱ्या फायद्यांबाबत जाणूनबुजून गैरसमज निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

टॅग्स :बँक