नवी दिल्ली - एटीएममधील फसवणूक रोखण्यासाठी दिल्ली स्टेट लेवल बँकर्स कमिटीने काही उपाय समोर आणले आहेत. कमिटीने असा उपाय सुचवला आहे की, जर तुम्ही एकदा एटीएममधून पैसे काढले असतील तर 6 ते 12 तासांच्या अवधीनंतरच पुन्हा पैसे काढता येतील. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर तुम्हाला निर्धारित वेळेतच पैसे काढता येणार आहेत. सध्या प्राथमिक स्तरावर या उपायावर विचार सुरू आहे.
दिल्ली एसएलबीसीचे संयोजक आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी मुकेश कुमार जैन यांनी सांगितले आहे की, एटीएममध्ये होणारी फसवणूक ही साधारणपणे रात्रीच्या वेळेपासून ते सकाळच्या वेळेत होते. अशावेळी जर आपण हा उपाय केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. या योजनेवर मागील आठवड्यात 18 बँकेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली आहे.
2018-19 मध्ये दिल्लीमध्ये 179 एटीएम फसवणुकीच्या घटना समोर आल्या. या प्रकरणात दिल्ली, महाराष्ट्रपासून काही काळ मागे आहे. कारण महाराष्ट्रात 233 एटीएम फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक महिन्याला कार्ड क्लोनिंगचे प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये मोठ्या संख्येत परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 2018-19 मध्ये देशभरात एटीएम फसणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊन 980 पर्यंत पोहचली आहे. मागच्या वर्षी या घटनांची संख्या 911 होती.
मुकेश कुमार जैन यांनी सांगितले की, या बैठकीत दुसऱ्या बँकर्सने वेगळे उपाय सुचविले यात जर कोणी तुमच्या एटीएममधून पैसे काढत असेल तर त्या खातेदाराला अलर्ट करण्यासाठी ओटीपी पाठविला जाईल. ही सिस्टम क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या ऑनलाइन व्यवहाराप्रमाणे असेल. याशिवाय बँकर्स एटीएमसाठी सेंट्रलाइजस्ड मॉनिटरिंग सिस्टमवरही चर्चा करण्यात आली. या OBC, SBI, PNB,IDBI बँक आणि कॅनरा बँक यांनी पहिल्यापासून लागू केलं आहे. त्यामुळे एटीएम फसवणुकीपासून सुटका मिळविण्यासाठी बँकांनी सुचविलेला हा उपाय जर अंमलात आला तर तुम्हाला एटीएममध्ये एकदा पैसे काढले तर दुसऱ्यांदा पैसे काढण्यासाठी 6 ते 12 तास थांबावे लागणार आहे.