Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांना स्वाइप मशीनमुळे ३,८०० कोटींचा भुर्दंड, एसबीआयचा अहवाल

बँकांना स्वाइप मशीनमुळे ३,८०० कोटींचा भुर्दंड, एसबीआयचा अहवाल

कार्ड स्वाइप मशीनवर कराव्या लागणा-या गुंतवणुकीपोटी बँकांना दरवर्षी ३,८०० कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:40 PM2017-09-29T23:40:46+5:302017-09-29T23:41:26+5:30

कार्ड स्वाइप मशीनवर कराव्या लागणा-या गुंतवणुकीपोटी बँकांना दरवर्षी ३,८०० कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात केले आहे.

Banks swipe out machines for Rs 3,800 crore, SBI report | बँकांना स्वाइप मशीनमुळे ३,८०० कोटींचा भुर्दंड, एसबीआयचा अहवाल

बँकांना स्वाइप मशीनमुळे ३,८०० कोटींचा भुर्दंड, एसबीआयचा अहवाल

मुंबई : कार्ड स्वाइप मशीनवर कराव्या लागणा-या गुंतवणुकीपोटी बँकांना दरवर्षी ३,८०० कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने जारी केलेल्या एका अहवालात केले आहे. कार्ड स्वाइप मशीनमधील गुंतवणुकीच्या तुलनेत त्यातून मिळणारा महसूल अत्यल्प असल्यामुळे हा फटका बँकांना बसणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार जुलैमध्ये २८.४ लाख कार्ड स्वाइप मशीनचे जाळे देशभरात होते. नोटाबंदीच्या आधी ही संख्या १५.१ लाख होती. याचाच अर्थ नोटाबंदीनंतर मशीनच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली. नोटाबंदीच्या आधी आॅक्टोबर २०१६ मध्ये एसबीआयच्या ३.४ लाख कार्ड स्वाइप मशीन होत्या. यंदाच्या जुलैमध्ये त्यांची संख्या दुपटीने वाढून ६.१३ लाख झाली.
पॉइंट आॅफ सेल (पीओएस) या नावानेही कार्ड स्वाइप मशीन ओळखल्या जातात. पीओएस केंद्रावरील व्यवहारांची संख्या दरमहा सरासरी १५० व्यवहार इतकीच मर्यादित आहे. व्यवहारांची संख्या वाढेनाशी झाली आहे. त्याच वेळी डेबिट कार्डवरील व्यवहारांवर बँकांना मिळणाºया शुल्कात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे हा व्यवहार बँकांसाठी आतबट्ट्याचा ठरला आहे. अहवालानुसार,कार्ड पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना अधिकाधिक पीओएस स्थापन करण्यास सांगण्यात येत आहे. बँका दररोज सरासरी ५ हजार पीओएस सध्या बसवीत आहेत. या तुलनेत पीओएसवरून होणाºया व्यवहारात वाढ होण्याचे प्रमाण अत्यंत धिमे आहे. पीओएसवरील व्यवहार वाढले नाहीत, तर कार्ड पुरविणाºया बँकांच्या तुलनेत कार्ड स्वाइप मशीन बसविणाºया बँकांसाठी या व्यवसायाच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

पीओएस वाढल्यास फायदा
एसबीआयच्या अहवालात म्हटले की, पीओएस बसविणाºया बँकांपेक्षा कार्ड पुरविणाºया बँका वेगळ्या असतील, तर अशा व्यवहारात मशीन बसविणाºया बँकांना तोटा होतो.
अशा व्यवहारांना ‘आॅफ-अस’ व्यवहार म्हटले जाते. यात मशीन बसविणाºया बँकांकडून कार्ड पुरविणाºया बँकांना शुल्क मिळते. त्यातून मोठा तोटा होतो. पीओएस आणि कार्ड एकाच बँकेचे असेल, तरच बँकांना लाभ होतो.

Web Title: Banks swipe out machines for Rs 3,800 crore, SBI report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक