Join us

नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बँका बंद राहणार; महाराष्ट्रात केवळ नऊ दिवसच सुट्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 5:18 AM

bank holidays 2021 :  महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त दोन दिवस तसेच गुरू नानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी आहे. याशिवाय दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार मिळून नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत.

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यामध्ये देशभरातील बँका १७ दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा ही समावेश आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ नऊच दिवस बँका बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त दोन दिवस तसेच गुरू नानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी आहे. याशिवाय दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार मिळून नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत.

यादिवशी राहणार बँकांचे कामकाज बंद६ नोव्हें. - लक्ष्मी पूजन/भाऊबीज/चित्रगुप्त जयंती यानिमित्त कानपूर, लखनौ, गंगटोक, इम्फाळ आणि सिमला येथे बँकांना सुटी, ७ नोव्हें. - रविवार, १० नोव्हें. - छठ पूजा/सूर्य पास्ती डाला छठ (सायन अर्घ्य) यानिमित्त पाटणा आणि रांचीत बँकांना सुटी ११ नोव्हें. - छठ पूजेनिमित्त पाटणात बँकांना सुटी १२ नोव्हें. - वंगला सणानिमित्त शिलाँग येथे बँकांना सुटी १३ नोव्हें. - दुसऱ्या शनिवार, १४ नोव्हें. - रविवार, १९ नोव्हें. - कार्तिक पौर्णिमा / गुरु नानक जयंतीनिमित्त देहरादून, हैदराबाद, जयपूर, ऐजवाल, बेलापूर, भोपाळ, चंदीगढ, लखनौ, मुंबई, नागपूर, जम्मू, कानपूर, कोलकता, नवी दिल्ली, रायपूर, रांची, सिमला आणि श्रीनगर येथे सुटी २१ नोव्हें. - रविवार, २२ नोव्हें. - कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरू येथे बँका बंद राहणार २३ नोव्हें. - सेंग कुट्सनेम निमित्त शिलाँग येथे बँकांना सुटी. २७ नोव्हें. - चौथ्या शनिवार, २८ नोव्हें. - रविवार.

टॅग्स :बँक