Join us  

Holidays List : मार्च महिन्यात होळी-महाशिवरात्रीची सुट्टी, एकूण 13 दिवस बंद राहणार बँका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 8:12 AM

आरबीआय ही बँकांची नियामक. आरबीआय प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या संपूर्ण वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जारी करते.

भारतात मार्च महिना हा  कोणत्याही आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. तसेच हा चौथ्या तिमाहीचाही शेवटचा महिना आहे. यामुळे या महिन्यात लोकांना बँकिंग, इंव्हेस्टमेंट आणि आयकराशी संबंधित अनेक कामे करावी लागतात. तसेच, या महिन्यात होळीसारखा मोठा सणही साजरा केला जातो. यावेळी मार्चमध्ये महाशिवरात्रीही साजरी केली जाणार आहे. अशा प्रकारे या वर्षात मार्च महिन्यामध्ये एकाच वेळी दोन मोठे सण साजरे केले जाणार आहेत. यामुळे बँकेशी संबंधित आपले कोणतेही काम असेल, तर ते प्राधान्याने करून घ्यायला हवीत. कारण मार्च महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध झोनमध्ये एकूण 13 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. (Bank Holidays in March 2022)

आरबीआय जारी करते लिस्ट -आरबीआय ही बँकांची नियामक. आरबीआय प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या संपूर्ण वर्षभरातील सुट्ट्यांची लिस्ट जारी करते. आरबीआय प्रत्येक राज्यांचे मुख्य सण आणि काही महत्वाचे प्रसंग लक्षात घेऊन ही लिस्ट जारी करत असते. याच बरोबर, कोणत्या सुट्टीच्या दिवशी, कोणत्या झेनमधील बँका बंदद असतील, हेही आरबीआय जाहीर सागते.

मार्च 2022 मध्ये या दिवशी बंद राहणार बँका -मार्च 2022 मध्ये सण आणि इतर महत्वाच्या प्रसंगी विविध झोनमध्ये एकूण सात दिवस बँका बंद राहतील. याशिवाय रविवारी बँकांना सुट्टी असते. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँकांचे कामकाज बंद राहते. यामुळे पुढील महिन्यात बँकांमध्ये कुठलेही काम असेल, तर बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा.

ही आहे संपूर्ण यादी -1 मार्च (मंगळवार) : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहणार आहेत.3 मार्च (गुरुवार) : लोसार निमित्त गंगटोक येथे बँकांचे कामकाज बंद असेल.4 मार्च (शुक्रवार) : चपचार कुट निमित्त आयजोलमध्ये बँकांना सुट्टी असेल.6 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेते.12 मार्च (शनिवार) :      महीन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी. 13 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेते.17 मार्च (गुरुवार) : होळी निमित्त देहरादून, कानपूर, लखनौ आणि रांची झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. 18 मार्च (शुक्रवार) : होली/Dhuleti/डोल जत्रा) निमित्त बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर सर्व झोनमध्ये बँका बंद राहतील.19 मार्च (शनिवार) :  होली/ओसांगचा दुसरा दिवस असल्याने भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.20 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेते.22 मार्च (मंगलवार) : बिहार दिवस निमित्त पाटणा झोनमद्ये बँका बंद असतील.26 मार्च (शनिवार) :    महीन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.27 मार्च (रविवार) : रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेते.

टॅग्स :बँकहोळीमहाशिवरात्री