नवी दिल्ली : सहा महिन्यांहून अधिक काळ आपली देणी परत करण्यास अपयशी ठरलेल्या विविध कंपन्यांच्या विरोधात बॅँका दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या विचारात आहेत. यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून परवानगीची गरज असून, ती मिळविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्या व्यक्ती अथवा कंपन्यांकडून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ येणे रक्कम वसूल होत नाही, त्यांच्याविरुद्ध बॅँका दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करू शकतात. अशी प्रक्रिया सुरू न केल्यास बॅँकांना सदरची येणे रक्कम ही बुडीत कर्ज दाखवून त्यासाठी वेगळी तरतूद करावी लागत असते. त्यामुळे बॅँकांच्या नफ्यावर परिणाम होत असल्याने बॅँकांकडून ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.उपलब्ध माहितीनुसार सिन्टेक्स इंडस्ट्रीज, रेलिगेअर फिनवेस्ट, रिलायन्स होम फायनान्स व रिलायन्स कम्युनिकेशनसह अनेक बिगर बॅँकिंग वित्त कंपन्यांचा समावेश आहे.
मार्च २०१९ मध्ये सिन्टेक्सने बॉण्ड्सची रक्कम परत करण्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर कंपनीने पुनर्गठनाची योजना सादर केली होती, जी बॅँकांनी नाकारली आहे. रेलिगेअर फिनवेस्टच्या प्रमोटर्सनी केलेल्या घोटाळ्यामुळे या कंपनीला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.या कंपनीनेही फेररचनेची योजना बॅँकांना सादर केली आहे. याशिवाय अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल या कंपन्याही फ्रॉड कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त विविध बिगर बॅँकिंग वित्तसंस्थांकडेही बॅँकांची मोठी रक्कम थकीत आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई सुरू केली जाणार आहे.अनिल अंबानींच्या कंपन्या फसवणाऱ्यादेशातील दुसºया क्रमांकाची बॅँक असणाºया पंजाब नॅशनल बॅँकेने अनिल अंबानी यांच्या काही कंपन्या या फसवणूक करणाºया कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडला बॅँकेने फसवणाºया (फ्रॉड) श्रेणीमध्ये टाकले आहे. या कंपनीने आपल्याकडील पैसा अन्य ठिकाणी वळविल्याचे फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्टवरून स्पष्ट झाल्यानंतर बॅँकेने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षी ३ जुलै रोजी बॅँकेचे अनिल अंबानींच्या समूहाकडे ८० कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी होते.