Join us

Bank Holiday: डिसेंबरमध्ये बँकांना १३ सुट्ट्या, महाराष्ट्र आणि गोव्यात एवढे दिवस राहणार बँका बंद, लवकर आटोपून घ्या महत्त्वाची कामे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:05 AM

Bank Holiday In December: नोव्हेंबर महिना संपायला आता केवळ ६ दिवस उरले आहेत. त्यानंतर डिसेंबर अर्थात वर्षातील शेवटच्या महिन्याला सुरुवात होईल. नव्या वर्षाचे स्वागत, ख्रिसमस तसेच इतर काही निमित्ताने डिसेंबर महिन्यात बँका बंद राहणार आहेत.

नवनी दिल्ली -  नोव्हेंबर महिना संपायला आता केवळ ६ दिवस उरले आहेत. त्यानंतर डिसेंबर अर्थात वर्षातील शेवटच्या महिन्याला सुरुवात होईल. नव्या वर्षाचे स्वागत, ख्रिसमस तसेच इतर काही निमित्ताने डिसेंबर महिन्यात बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांशी संबधित काही महत्त्वाची कामे असतील, तर तरी लवकरात लवकर आटोपून घ्या. डिसेंबर महिन्यात देशभरात बँका ह्या १३ दिवस बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्रात ५ दिवस आणि गोव्यामध्ये ७ दिवस बँका बंद असतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यासाठी बँक हॉलीडेची यादी सादर केली आहे. त्यानुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून मिळून एकूण १३ दिवस बँका बंद असलीत. त्यामुळे तुम्ही एखादे दिवस बँकेत गेलात आणि बँक बंद असेल तर मोठी अडचण येऊ शकते. बँकांचे सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहिल्यास विविध राज्ये आणि शहरांमध्ये ३, १२, १९, २४, २६, २९, ३०, ३१ या तारखांना बँकांना सुट्टी असेल. तर ४, १०, ११, २४, २५ डिसेंबर रोजी बँकांना रविवारची, साप्ताहिक सुट्टी असेल. दरम्यान, नाताळही रविवारी आला आहे.

बँकांच्या सुट्ट्या ह्या विविध राज्यांमधील सणावारांवर अवलंबून असतात. दरम्यान, या यादीनुसार ४, १०, ११, १८, २४, २५, या दिवशी बँका बंद राहतील. तर गोव्यामध्ये ४, १०, ११, १८, २४, २५ या व्यतिरिक्त ३ आणि १९ डिसेंबर रोजी बँका बंद राहतील. 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र