Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्यापासून पाच दिवस बँका राहणार बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

उद्यापासून पाच दिवस बँका राहणार बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) उद्यापासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:49 AM2018-12-20T08:49:02+5:302018-12-20T09:00:01+5:30

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) उद्यापासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Banks will remain closed for five days from tomorrow | उद्यापासून पाच दिवस बँका राहणार बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

उद्यापासून पाच दिवस बँका राहणार बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

Highlightsऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संप पुकारण्याचा निर्णय घेतला5 दिवस बँका बंद राहणार असल्यानं आजच आपण बँकांमधील कामं उकरून घ्यावीत.या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली- बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) उद्यापासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 डिसेंबरनंतर 5 दिवस बँका बंद राहणार असल्यानं 20 तारखेच्या आधीच आपण बँकांमधील कामं आटोपून घ्यावीत. या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दाही या संपाच्या केंद्रस्थानी असणार आहे. 21 डिसेंबरला शुक्रवार असून, त्याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे.

22 आणि 23 डिसेंबरला शनिवार, रविवार असल्यानं बँकांना सुट्टीच राहणार आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून युनायटेड फोरमने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकांची कामं आजच आटोपून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळी पैशांची चणचण भासणार नाही. 

Web Title: Banks will remain closed for five days from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक