Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑक्टोबरमध्ये बँका १५ दिवस राहणार बंद; आधीच नियोजन करा, गैरसोय टाळा

ऑक्टोबरमध्ये बँका १५ दिवस राहणार बंद; आधीच नियोजन करा, गैरसोय टाळा

दसरा, दिवाळी अन् सणांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 07:47 AM2024-09-28T07:47:58+5:302024-09-28T07:48:30+5:30

दसरा, दिवाळी अन् सणांची रेलचेल

Banks will remain closed for 15 days in October | ऑक्टोबरमध्ये बँका १५ दिवस राहणार बंद; आधीच नियोजन करा, गैरसोय टाळा

ऑक्टोबरमध्ये बँका १५ दिवस राहणार बंद; आधीच नियोजन करा, गैरसोय टाळा

नवी दिल्ली : दसरा, दिवाळीसह इतर सण, उत्सव व साप्ताहिक सुट्या यांमुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्या सर्व राज्यांत नसतील. राज्यानुसार सण भिन्न असल्यामुळे सुट्यांची संख्याही भिन्न असेल.

सुट्या लक्षात घेऊन आपल्या आर्थिक कामांचे नियोजन नागरिकांनी करावे, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. ऑक्टोबरमधील सुट्यांत शनिवार-रविवार, जम्मू-काश्मिरातील विधानसभा निवडणूक, गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजन, काटी बिहू यांचा समावेश आहे. सुट्यांच्या काळात यूपीआय, नेट बँकिंग अथवा मोबाइल बँकिंग व एटीएम सेवा सुरू राहील.

कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात सुट्टी?

१ ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक (जम्मू)
२ ऑक्टोबर  : गांधी जयंती (देशभर)
३ ऑक्टोबर  : नवरात्र स्थापना(जयपूर)
६ ऑक्टोबर  : रविवार (देशभर)
१० ऑक्टोबर  : दुर्गापूजा, दसरा, महासप्तमी (आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा, कोलकाता)
११ ऑक्टोबर  : दसरा, महाअष्टमी, महानवमी इ. (आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, ईटानगर, कोहिमा, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग)
१२ ऑक्टोबर  : दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा (जवळपास संपूर्ण देशात)
१३ ऑक्टोबर  : रविवार (देशभर)
१४ ऑक्टोबर  : दुर्गापूजा, दासेन (गंगटोक)
१६ ऑक्टोबर  : लक्ष्मीपूजन (आगरतळा, कोलकाता)
१७ ऑक्टोबर  : महर्षी वाल्मीकी जयंती व काटी बिहू (बंगळुरू,  गुवाहाटी)
२० ऑक्टोबर  : रविवार (देशभर)
२६ ऑक्टोबर  : चौथा शनिवार (देशभर)
२७ ऑक्टोबर  : रविवार (देशभर)
३१ ऑक्टोबर  : दिवाळी (देशभर)
 

Web Title: Banks will remain closed for 15 days in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.