Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Strike : उद्यापासून सलग चार दिवस बँका राहणार बंद! आजच उरकून घ्या महत्त्वाचे काम

Bank Strike : उद्यापासून सलग चार दिवस बँका राहणार बंद! आजच उरकून घ्या महत्त्वाचे काम

Bank Strike : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे कर्मचारी संपावर जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:20 AM2022-03-25T11:20:20+5:302022-03-25T11:21:04+5:30

Bank Strike : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे कर्मचारी संपावर जात आहेत.

banks will remain closed for four consecutive days from tomorrow get your important work done soon | Bank Strike : उद्यापासून सलग चार दिवस बँका राहणार बंद! आजच उरकून घ्या महत्त्वाचे काम

Bank Strike : उद्यापासून सलग चार दिवस बँका राहणार बंद! आजच उरकून घ्या महत्त्वाचे काम

नवी दिल्ली : बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते आजच उरकून घ्या. कारण उद्यापासून म्हणजे शनिवारपासून सलग चार दिवस बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. दरम्यान, येत्या शनिवार-रविवार बँकेला सुट्टी (Weekly Closing Day)आहे. यानंतर येत्या सोमवार आणि मंगळवारी बँक कर्मचारी संपावर (Bank Strike) जाणार आहेत. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे कर्मचारी संपावर जात आहेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, बँक युनियनच्या संपामुळे 28 मार्च आणि 29 मार्च रोजी बँकेच्या कामकाजावर परिणाम होईल. हा संप खाजगीकरणाच्या विरोधात केला जात आहे. तसेच, या काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे,. 

एटीएममधून पैसे काढताना अडचण येणार
या चार दिवसांत बँकेत कोणतेही काम न झाल्यास बँकेची एटीएमही रिकामे होऊ शकतात, असे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये, जेथे थर्ड पार्टी पैसे भरतात, तेथे कोणतीही अडचण येणार नाही. परंतु ज्या एटीएममध्ये बँकेचे कर्मचारी पैसे भरण्याचे काम करतात, त्या एटीएममध्ये रोकड संपू शकते, असे बँक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ संप
विशेष म्हणजे, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (AIBEA) दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. या संपात बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. मात्र, संपाच्या काळात कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आश्वासन बँकांनी दिले आहे.

Web Title: banks will remain closed for four consecutive days from tomorrow get your important work done soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.