नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी २८ रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
एसबीआय, पीएनबी व बँक आॅफ बडोदा यांच्यासह बहुतांश बँकांनी या संपाबाबत ग्राहकांना सूचना दिली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँकेत कामकाज सुरू राहाणार आहे. या बँकात्ां फक्त चेक क्लिअरन्सचे काम होणार नाही.
यूएफबीयूअंतर्गत नऊ संघटना आहेत. भारतीय मजदूर संघाशी संबंधित नॅशनल आॅर्गनायजेशन आॅफ बँक वर्कर्स व नॅशनल आॅर्गनायजेशन आॅफ बँक आॅफिसर्स या संघटना संपात सहभागी होणार नाहीत. आॅल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले की, २१ फेब्रुवारी रोजी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकांचा उद्या संप
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी २८ रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
By admin | Published: February 27, 2017 04:53 AM2017-02-27T04:53:53+5:302017-02-27T04:53:53+5:30