Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाप्पांनी दिला पाच पट लाभ; सरकारी बँकांचे शेअर्स आठवड्यात ८ टक्क्यांनी वाढले

बाप्पांनी दिला पाच पट लाभ; सरकारी बँकांचे शेअर्स आठवड्यात ८ टक्क्यांनी वाढले

खासगी क्षेत्राच्या तुलनेत सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदारांना अधिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 08:12 AM2023-09-20T08:12:53+5:302023-09-20T08:13:11+5:30

खासगी क्षेत्राच्या तुलनेत सरकारी बँकांमुळे गुंतवणूकदारांना अधिक फायदा

Bappa gave fivefold benefit; Shares of state-owned banks rose 8 percent on the week | बाप्पांनी दिला पाच पट लाभ; सरकारी बँकांचे शेअर्स आठवड्यात ८ टक्क्यांनी वाढले

बाप्पांनी दिला पाच पट लाभ; सरकारी बँकांचे शेअर्स आठवड्यात ८ टक्क्यांनी वाढले

मुंबई : लागोपाठ अकरा दिवस सुसाट असलेल्या शेअर बाजाराला सोमवारी ब्रेक लागला. सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली. अशात सरकारी बँकांचे शेअर्स आठवड्यात ८ टक्क्यांनी वाढले. या आर्थिक वर्षात ते ६२ टक्क्यांहून अधिक वाढले. परंतु, याचवेळी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स या वर्षात केवळ १३ टक्क्यांनी वाढला आहे. याचाच अर्थ सरकारी बँकांनी खासगी बँकांच्या तुलनेत ५ पट अधिक परतावा दिला आहे. 

तज्ज्ञ काय सांगतात? 

गेल्या काही दिवसांत सरकारी बँकांची मिळकत आणि एकूण मालमत्ता यांची स्थिती सातत्याने सुधारत आहे. सरकारी बँकांमधील चांगल्या भांडवलाची स्थिती यापुढेही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या कारणांमुळेच सरकारी बँकांच्या शेअर्सची स्थिती चांगली आहे, असे जाणकारांना वाटते.

विलीनीकरण पडले पथ्यावर 

देशातील दहा सरकारी बँकांचे २०२० मध्ये ४ सार्वजनिक बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते. या विलिनीकरणामुळे सरकारी बँकांच्या एकूण मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे बँका फायद्यात आहेत

Web Title: Bappa gave fivefold benefit; Shares of state-owned banks rose 8 percent on the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.