Lokmat Money > बिझनेस न्यूज > बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा

बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा

TCS ने नवीन चार्टर्ड अकाउंटंट्सना मुंबईत ‘असिस्टंट सिस्टम ॲनालिस्ट ट्रेनी’ या पदासाठी वार्षिक ७.५ लाख रुपयांची CTC ऑफर केली आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 08:10 PM2024-08-20T20:10:22+5:302024-08-20T20:11:41+5:30

TCS ने नवीन चार्टर्ड अकाउंटंट्सना मुंबईत ‘असिस्टंट सिस्टम ॲनालिस्ट ट्रेनी’ या पदासाठी वार्षिक ७.५ लाख रुपयांची CTC ऑफर केली आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Bapre! Exam like IAS and salary like 'Clerk'; Discussion on social media about new 'CA' package in TCS | बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा

बापरे! परीक्षा IAS सारखी अन् पगार 'क्लार्क' एवढा; TCS मध्ये नव्या 'CA'च्या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा

नोकरीसाठी अनेक कंपन्या जाहीराती काढत असतात. यात कंपन्यांची परीक्षा आणि पगार याबाबत माहिती असतात. सध्या टीसीएसमध्ये सीए पदासाठी जागा निघाल्या आहेत.  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये नवीन चार्टर्ड अकाउंटंट्सच्या पगाराच्या ऑफरवरून गदारोळ झाला आहे. TCS मुंबईत असिस्टंट सिस्टम ॲनालिस्ट-ट्रेनी' या नोकरीसाठी वार्षिक ७.५ लाख रुपयांचे पॅकेज देत आहे. नोकरीची मुलाखत १० सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. मुलाखत आणि लेखी परीक्षा होईल, टीसीएसच्या या ऑफरमुळे अनेक सीए उमेदवार नाराज आहेत. मुंबईसारख्या महागड्या शहरात एवढा कमी पगार देणे योग्य नाही, असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 378 अन् निफ्टी 126 अंकांच्या वाढीसह बंद...

टीसीएसची ही जागा मुंबईत आहे. नोकरीसाठी उमेदवाराला मुंबईत यावे लागणार आहे. या जॉबसाठी साडेसात लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जात आहे. ३,८६,६५२ रुपयांचे सीटीसी आणि ३,६३,३४८ रुपयांचे व्हेरिएबल सीटीसी आहे. दरम्यान, आता या पॅकेजवरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

"टीसीएस सारखी मोठी कंपनी चार्टर्ड अकाउंटंटना एवढा कमी पगार देत आहे हे पाहून खूप वाईट वाटते. सनदी लेखापाल होण्यासाठी लागणारी मेहनत त्यांना समजत नाही. ICAI बंधुत्वाचा एक भाग होण्यासाठी आम्ही आमच्या कौशल्यांचा सन्मान करण्यात कित्येक तास घालवले आहेत", अशी प्रतिक्रिया केरळमधील एका सीएने दिली. 

सोशल मीडियावर एका युजरने लिहिले, "टीसीएसकडून ३.८ लाख रुपये पगार ही आमच्या मेहनतीची आणि व्यवसायाची थट्टा आहे. बीकॉम पदवीधर यापेक्षा जास्त कमावतो. ICAI आणि CCM काय पावले उचलत आहेत? मेट्रो शहरांसाठी सुधारित किमान पॅकेज. ते वर्षाला किमान ११-१२ लाख रुपये केले पाहिजे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, हा खरोखर नवीन सीएचा पगार आहे किंवा डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती केली जात आहे.

Web Title: Bapre! Exam like IAS and salary like 'Clerk'; Discussion on social media about new 'CA' package in TCS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.