Join us  

बापरे! चोराला शोधा, २०० कोटींचे मालक व्हा, जबरदस्त ऑफर; वाचा नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 3:14 PM

क्रिप्टो प्लॅटफॉर्म WazirX ने काही दिवसांपूर्वी सायबर चोरीमध्ये २३४ मिलियन डॉलर किमतीची डिजिटल मालमत्ता गमावली आहे. चोराचा शोध घेणाऱ्यांना आता कंपनीच्या मालकांनी नवी ऑफर दिली.

क्रिप्टो प्लॅटफॉर्म Wazirx यांच्यात ऑनलाईन मोठी चोरी झाली आहे. या चोरीची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता चोराचा शोध सुरू झाला आहे. आता क्रिप्टो प्लॅटफॉर्म WazirX ने सायबर चोरीमध्ये गमावलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार, जर तुम्ही चोरीला गेलेली मालमत्ता परत आणली तर तुम्ही अब्जाधीशांच्या यादीत तुमचा नंबर लागू शकतो. याबाबत ट्विटरवर कंपनीचे सहसंस्थापक यांनी माहिती दिली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या ऑफरबद्दल माहिती देताना, वझीरएक्सचे सह-संस्थापक निश्चल शेट्टी म्हणाले की, आम्ही एक बक्षीस जाहीर केला आहे, ज्याच्या मदतीने चोरी झालेल्या मालमत्तेचा मागोवा घेतला जाऊ शकतो,ते परत मिळवू शकतो.

कंपनीने यापूर्वी वसुलीसाठी कमी पैसे देऊ केले होते. यापूर्वी कंपनीने सांगितले होते की, चोरी झालेल्या मालमत्तेची माहिती देण्यासाठी १०,००० डॉलरचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय कंपनी वसूल केलेल्या रकमेपैकी ५ टक्के रक्कम व्हाईट हॅट रिवॉर्ड म्हणून देईल. ज्यानंतर इंटरनेटवर लोक कमी रिवॉर्डसाठी कंपनीवर टीका करत होते. त्यानंतर कंपनीने रिवॉर्ड २३ मिलियन डॉलरपर्यंत वाढवले.

'ही घटना फिशिंगमुळे नाही तर अनेक हार्डवेअर वॉलेट मधील आहेत. कस्टडी  प्रॉव्हायडर लिमिनलने या घटनेसाठी तडजोड केलेल्या वझीरएक्स मशीनला जबाबदार धरले आहे.

ही घटना क्रिप्टो प्लॅटफॉर्म वझीरएक्सवर १८ जुलै रोजी घडली. यामध्ये हॅकर्सनी WazirX multisig Ethereum वॉलेटमधून २३४ मिलियन चोरले. याप्रकरणी कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पुढील कायदेशीर कारवाईही सुरू आहे.

टॅग्स :सामाजिकसोशल व्हायरल