मुंबई : संकटग्रस्त अॅटलस ज्वेलरी ग्रुपला ७ कोटी दिरहम कर्ज देण्याच्या प्रकरणाची रिझर्व्ह बँक चौकशी करीत असताना सरकारने बँक आॅफ बडौदाचे कार्यकारी संचालक के.व्ही. राममूर्ती यांची बदली केली आहे.
बँक आॅफ बडौदाच्या दुबई शाखेचे राममूर्ती प्रमुख असताना हे कर्ज देण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना सरकारने एक अभूतपूर्व पाऊल उचलत राममूर्ती यांची बदली बँक आॅफ बडौदापेक्षा छोटी बँक असलेल्या युनायटेड बँकेत केली. तेथे २९ आॅगस्ट रोजी राममूर्ती यांनी कार्यकारी संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वत: राममूर्ती यांनी या घडामोडीला दुजोरा दिला. रिझर्व्ह बँकेने बँक आॅफ बडौदाच्या दुबई शाखेची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरू असताना राममूर्ती यांना तेथे कायम ठेवल्यास हितसंबंध आडवे येतील, असे रिझर्व्ह बँकेने कळविले आहे. पश्चिम आशियाई अॅटलस ग्रुपचे प्रवर्तक केरळमध्ये जन्मलेले एम. रामचंद्रन आहेत.
बडोदा बँकेच्या कार्यकारी संचालकांची बदली
संकटग्रस्त अॅटलस ज्वेलरी ग्रुपला ७ कोटी दिरहम कर्ज देण्याच्या प्रकरणाची रिझर्व्ह बँक चौकशी करीत असताना सरकारने बँक आॅफ बडौदाचे कार्यकारी संचालक के.व्ही. राममूर्ती यांची बदली केली आहे.
By admin | Published: September 14, 2015 12:58 AM2015-09-14T00:58:00+5:302015-09-14T00:58:00+5:30