नवी दिल्ली : ६,१00 कोटी रुपयांच्या विदेशी चलन देण्याच्या घोटाळ्यात अडकलेल्या बँक आॅफ बडोदाला रिझर्व्ह बँकेने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बँक आॅफ बडोदाच्या वतीने शेअर बाजारास देण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेच्या अंतर्गत आॅडिटमध्ये काही अनियमितता आढळून आल्या होत्या. या प्रकरणी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी चौकशी केली. बँकेच्या अंतर्गत व्यवहारात अनेक त्रुटी आणि दुर्बलता दिसून आल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक तरतुदींच्या बाबतीत या त्रुटी घातक आहेत. देवघेवीच्या व्यवहारांची निगराणी, वित्तीय माहिती यंत्रणेला वेळेत माहिती देणे, विशिष्ट ग्राहक कोड प्रदान करणे इ. पातळीवर या त्रुटी आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर बँक आॅफ बडोदाने म्हटले की, बँकेने व्यापक सुधारणात्मक कार्य योजना लागू केली आहे. अंतर्गत नियंत्रण वाढविणे आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. चौकशीत असे आढळून आले की, बँक आॅफ बडोदाने संशयित हस्तांतरण अहवाल सादर करण्यास खूप उशीर केला. केवायसी नियमांचे पालन न करताच खाते उघडण्याची परवानगी देण्यात आली.
आर्थिक व्यवहार झाला, पण आयात झालीच नाही
बँक आॅफ बडोदाच्या दिल्लीतील अशोक विहार शाखेने आयात मालाच्या देय प्रकरणात ६,१00 कोटी रुपये हाँगकाँगला पाठविले होते. हा घोटाळा गेल्या वर्षी घडला होता. हा पैसा आयातीसाठी अदा झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी अशी कोणतीही आयात झालेली नाही, असे चौकशीत समोर आले.
बडोदा बँकेला पाच कोटींचा दंड
६,१00 कोटी रुपयांच्या विदेशी चलन देण्याच्या घोटाळ्यात अडकलेल्या बँक आॅफ बडोदाला रिझर्व्ह बँकेने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
By admin | Published: July 26, 2016 01:54 AM2016-07-26T01:54:13+5:302016-07-26T01:54:13+5:30