Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी केले. त्यांनी सांगितले की, भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:10 AM2018-05-03T05:10:45+5:302018-05-03T05:10:45+5:30

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी केले. त्यांनी सांगितले की, भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास

Base biometric data is 100% safe | आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित

आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित

नवी दिल्ली : आधारचा बायोमेट्रिक डाटा १00 टक्के सुरक्षित आहे, असे प्रतिपादन मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांनी केले.
त्यांनी सांगितले की, भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता यात समतोल साधण्यास सरकार, ग्राहक आणि नागरी समाज समुदाय यांनी एकत्रित काम करायला हवे. राय यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आधारच्या डाटाबेसचे दोन भाग आहेत. एक म्हणजे नाव, वय, पत्ता यांसारखा जनसांख्यिकीय डाटा आणि दुसरा म्हणजे बायोमेट्रिक डाटा. लोक जेव्हा डाटाबेस सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करतात, तेव्हा त्यांना बायोमेट्रिक डाटा अपेक्षित असतो. बायोमेट्रिक डाटा फुटल्याची एकही घटना अजून तरी समोर आलेली नाही. आधार डाटाबेसला कमाल सुरक्षा देण्यात आली आहे. वाईटातल्या वाईट डाटा फुटीतही हा डाटा सुरक्षित राहिला आहे. जिओवर हल्ला झाला, तेव्हा त्यांचा डाटा फुटला होता, पण आधारचा डाटा सुरक्षित राहिला.
ओळख पडताळणीसाठी जिओसह इतरही अनेक कंपन्यांना आधार डाटाबेसचा संपर्क देण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधले असता, राय यांनी सांगितले की, होय पडताळणीसाठी संपर्क सुविधा देण्यात आली आहे.

Web Title: Base biometric data is 100% safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.