Join us

५ दिवसांत बासमती तेराशे रुपयांनी महाग

By admin | Published: November 21, 2015 2:38 AM

देशातील महागाईचा भडका दिवसागणिक आणखी प्रखर होत आहे. शुक्रवारी बासमती तांदूळ आणखी ५00 रुपयांनी महाग झाला. गेल्या पाच दिवसांत बासमती तांदूळ तब्बल

नवी दिल्ली : देशातील महागाईचा भडका दिवसागणिक आणखी प्रखर होत आहे. शुक्रवारी बासमती तांदूळ आणखी ५00 रुपयांनी महाग झाला. गेल्या पाच दिवसांत बासमती तांदूळ तब्बल १,३00 रुपयांनी महाग झाला आहे. दरम्यान, उडदाची डाळ, साखर, मोहरी तेल, धणे आणि जिरे या वस्तूंचे भावही शुक्रवारी महागले. गेल्या काही दिवसांपासूनजीवनावश्यक वस्तू दररोज महाग होत आहेत. बासमती तांदूळ असोचेमच्या अहवालानंतर बासमती तांदूळ महागायला सुरुवात झाली. शुक्रवारी दिल्लीच्या ठोक बाजारात बासमती आणखी ५00 रुपयांनी महागला. बासमती सामान्य आणि पुसार १,१२१ या जातीच्या तांदळाचे भाव अनुक्रमे ५,000 ते ५,४00 आणि ४,२00 ते ५,000 रुपये क्विंटल होते. ते आता ५,४00 ते ५,९00 आणि ४,५00 ते ५,५00 रुपये क्विंटल झाले आहेत. श्रीलालमहल तांदळाचे भावही ५00 रुपयांनी वाढून ११,३00 रुपये क्विंटल झाले. बिगर बासमती तांदळाच्या भावांतही ५0 ते ७५ रुपयांची वाढ झाली आहे. अशी झाली भाववाढरविवारी असोचेमने एक अहवाल जारी करून तांदूळ महागणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून तांदळाच्या भावात वाढ सुरू झाली. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांच्या काळात बासमती तांदूळ तब्बल १,३00 रुपयांनी महाग झाला आहे. बासमती तांदुळ सोमवारी ५0 रुपयांनी, मंगळवारी २५0 रुपयांनी, बुधवारी २00 रुपयांनी, गुरुवारी ३00 रुपयांनी तर शुक्रवारी ५00 रुपयांनी महाग झाला. साखर ३० रुपयांपर्यंत महागलीसाखरेच्या भावातही शुक्रवारी २0 ते ३0 रुपयांची वाढ झाली. विविध प्रकारची साखर २,७६0 ते २,९९0 रुपये क्विंटल होती, ती आता २,७८0 ते ३,0२0 रुपये क्विंटल झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)