Join us

नोकर कपातीचा सपाटा सुरू असताना भारतीय कंपनी देतेय २५००० जणांना नोकरी, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:18 PM

गुगल, फेसबुकसारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकर कपात केली. जगभरात मंदीची शक्यता आहे आणि भारतासह अनेक जागतिक कंपन्यांमध्ये कपात सुरू आहे.

गुगल, फेसबुकसारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकर कपात केली. जगभरात मंदीची शक्यता आहे आणि भारतासह अनेक जागतिक कंपन्यांमध्ये कपात सुरू आहे. Facebook, Twitter, Byju's, Microsoft अशी दिग्गज कंपन्यांची यात रांग आहे. पण या सगळ्या वातावरणात एका भारतीय कंपनीनं २५ हजार लोकांना नोकऱ्या देण्याची तयारी केली आहे. 

बीडीओ इंडिया जी अकाउंटिंग क्षेत्रात काम करणारी कंपनी येत्या ५ वर्षांत २५,००० लोकांना रोजगार देणार आहे. म्हणजेच दरवर्षी जवळपास ५ हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. व्यावसायिक सेवा फर्म BDO इंडियाच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या आठवड्यातच ५,००० पार केली आहे. कंपनीचे इंडिया मॅनेजिंग पार्टनर मिलिंद कोठारी म्हणतात की बीडीओने २०१३ मध्ये केवळ २३० कर्मचारी आणि २ कार्यालयांसह काम करण्यास सुरुवात केली होती. 

मिलिंद कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, आता २०१८ च्या अखेरीस कंपनी आपल्या भारतातील ऑपरेशनमध्ये सुमारे १७,००० लोकांची आणि ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये ८,००० लोकांची भरती करेल. 

ऑडिटमधून येते ४०% ग्रोथBDO ने १० वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक सेवा क्षेत्रात एक मजबूत कंपनी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रावर अर्न्स्ट अँड यंग (EY), डेलॉइट, PwC आणि KPMG सारख्या ४ मोठ्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. BDOs च्या सरासरी वार्षिक वाढीपैकी ४० टक्के ही ऑडिट विभागातून येते. कंपनीसाठी ऑडिट विभाग दरवर्षी ४० ते ४५ टक्के दराने वाढत आहे. त्याच वेळी, सल्लागार IBS आणि व्यवहार सपोर्ट सेवा सारख्या कंपनीचा व्यवसाय दरवर्षी सुमारे ३० ते ३५ टक्के दराने वाढत आहे.

छोट्या-मोठ्या कंपन्यांना सेवा देण्याचं काममिलिंद कोठारी म्हणतात की BDO ही आधीच देशातील सहावी सर्वात मोठी ऑडिट फर्म आहे. कंपनीने मीड-मार्केट ग्राहकांना सेवा देण्यापासून सुरुवात केली. आता ही कंपनी बड्या उद्योग समूहांसह अनेक महापालिकांच्या लेखापरीक्षणाचे कामही पाहत आहे. भारतातील ६ मोठ्या ऑडिट कंपन्या येत्या काही वर्षांत खूप वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :नोकरी