UPI पेमेंट किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करणं इतकं सोपं आणि सोयीस्कर बनलंय की अनेकदा आपण विचार न करता कार्ड स्वाईप किंवा ऑनलाइन माहिती सरळ देऊन टाकतो. परंतु अनेकदा लोकांसोबत असं घडतं की त्यांना फोन येतो आणि बँकेच्या किंवा काही शॉपिंग वेबसाइटच्या नावानं कार्ड तपशील विचारला जातो. काही लोक त्यांचे तपशील देखील शेअर करतात आणि फसवणुकीला बळी पडतात.
दरम्यान, कार्ड सुरक्षित करण्यासाठी, एन्क्रिप्शन आणि इतर सुरक्षा पद्धती वापरल्या जातात, जसे की तुमचा ऑनलाइन सेव्ह केलेला डेटा एनक्रिप्ट करणे. याव्यतिरिक्त, पेमेंट कार्ड डेटा अनधिकृतपणे पाहणे, कॉपी करणे किंवा स्कॅन करणे यापासून संरक्षण करण्यासाठी देखील पावले उचलली जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला स्वतःला काही महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागेल, मग ते तुमच्या कार्डचे तपशील फोनवर शेअर करणे असो किंवा ऑनलाइन माहिती टाकण्यासारखे प्रकार असो.
कॉलर व्हेरिफाय कराजर तुम्ही कार्डच्या तपशीलाबाबत कॉल केला नसेल, तर फोन डिस्कनेक्ट करा आणि तपशीलांची पडताळणी करण्यासाठी थेट कंपनीला कॉल करा. स्कॅमर्स अनेकदा मोठ्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवतात आणि तुमचे पेमेंट अयशस्वी झालं आहे किंवा डिलिव्हरी रिलीझ करण्यासाठी पेमेंट करणे आवश्यक आहे हे पटवून देतात. कोणतीही माहिती देण्यापूर्वी, कॉलर वैध आहे आणि कॉल योग्य हेतूने केला आहे याची खात्री करा.
भरवसा करू नकाजर तुम्ही कॉलर किंवा ऑनलाइन चॅटद्वारे बोलत असाल आणि आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहोत त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आपल्याला शंका असल्यास किंवा काहीतरी चुकीचे वाटत असल्यास, बोलणं थाबंवा. फोनवर योग्य व्यक्ती असल्याचं समजल्यास तुम्ही त्यांना नंतर कधीही कॉल करू शकता.
पेमेंटची सुरक्षित पद्धततुम्ही याआधी कंपनीला इतर (अधिक सुरक्षित) पद्धतींद्वारे पैसे दिले असल्यास, तीच पद्धत वापरण्यास सांगा.
रेकॉर्ड ठेवातुम्ही कंपनीचे तपशील, तुम्ही ज्या प्रतिनिधीशी बोलत आहात आणि तुमच्याकडून घेतलेली रक्कम सेव्ह केल्याची खात्री करा. तुम्ही ऑर्डर किंवा व्यवहाराचा संदर्भ देखील विचारला पाहिजे. त्यांना पावती पाठवायला सांगायला विसरू नका. तुमच्या कार्डवर केलेला व्यवहार पावतीशी जुळतो की नाही ते तपासा. ते तुमच्या बँकिंग अॅपवर तपासा, स्टेटमेंट येण्याची वाट पाहू नका.