Join us

कुठेही फोन चार्ज करत असाल तर सावधान

By admin | Published: February 17, 2017 7:17 AM

मिळेल तिथे किंवा मिळेल त्याच्या चार्जरने फोन चार्ज करायची सवय बहुतांश लोकांना असते. तुम्हालाही अशीच सवय असेल तर आता खबरदारी घ्या.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - स्मार्टफोनची लवकर संपणारी बॅटरी म्हणजे सर्वच स्मार्टफोन वापरणा-यांची सर्वात मोठी डोकेदुखी. त्यामुळे बॅटरी संपायला आली की मिळेल तिथे किंवा मिळेल त्याच्या चार्जरने फोन चार्ज करायची सवय बहुतांश लोकांना असते. तुम्हालाही अशीच सवय असेल तर आता खबरदारी घ्या. कारण कुठेही फोन चार्जिंगला लावला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो.
 
बस स्थानक, रेल्वे स्थानक, मॉल,मोठमोठ्या कंपन्या आदी ठिकाणी फोन चार्जिंग करण्याची सुविधा असते. मात्र, तेथील चार्जिंग सॉकेट हॅक करून तुमचा फोन सहज हॅक केला जाऊ शकतो. सीएनएनने  Authentic8 च्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
तुम्ही फोन चार्ज करण्यासाठी जी वायर वापरतात त्याच वायरचा उपयोग तुमच्या फोनमधील डेटा दुस-या डिव्हाइसमध्ये पाठवण्यासाठी केला जातो.  फोनला  कंप्युटरसोबत जोडण्यासाठीही केला जातो. पण जर हॅक करण्यात आलेल्या सॉकेटला तुम्ही तुमची वायर जोडली तर तुमच्या फोनमधील सर्व माहिती हॅकर चोरू शकतो. याला ज्यूस जॅकींग असं म्हटलं जातं.
 
त्यामुळे यापुढे अनोळखी ठिकाणी फोन चार्जिंगला लावताना योग्य ती खबरदारी घ्या.