नवी दिल्ली : मोबाइल फोन ग्राहकांना वारंवार अनधिकृत टेलिमार्केटिंग संदेश (मेसेज) पाठवून त्रास देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांनी यासाठी तात्काळ पावले उचलावीत. संदेशांच्या खाक्यांना ३० आणि ६० दिवसांत प्रतिबंधित करण्यात यावे.
हे करावे लागेल...nएकसारखे हेडर विविध संस्थांच्या नावे नोंदणीकृत करता येणार नाही. nडीएलटी मंचावर नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग संस्थांना प्रतिबंध घालावा लागेल.nसंदेश नोंदणीकृत टेलिमार्केटिंग संस्थेकडून पाठविला जाणार नाही, याची व्यवस्था करावी लागेल.nनिर्देशांचे पालन न करणाऱ्या टेलिमार्केटिंग संस्थांवर कारवाई करावी लागेल. nनिर्देशाची अंमलबजावणी ३० दिवसांत करावी लागेल.