Lokmat Money > बिझनेस न्यूज > यूपीआयद्वारे व्यवहार करताना सावध राहा, ९५ हजारांपेक्षा अधिक लोक फसवणुकीचे शिकार

यूपीआयद्वारे व्यवहार करताना सावध राहा, ९५ हजारांपेक्षा अधिक लोक फसवणुकीचे शिकार

गेल्या तीन वर्षांमध्ये हा आकडा अडीच लाखांहून अधिक आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने संसदेत ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 05:02 AM2023-03-25T05:02:57+5:302023-03-25T05:03:44+5:30

गेल्या तीन वर्षांमध्ये हा आकडा अडीच लाखांहून अधिक आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने संसदेत ही माहिती दिली.

Be careful while transacting through UPI, more than 95 thousand people are victims of fraud | यूपीआयद्वारे व्यवहार करताना सावध राहा, ९५ हजारांपेक्षा अधिक लोक फसवणुकीचे शिकार

यूपीआयद्वारे व्यवहार करताना सावध राहा, ९५ हजारांपेक्षा अधिक लोक फसवणुकीचे शिकार

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२२-२३ मध्ये ‘युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस’च्या (यूपीआय) माध्यमातून १२५.९४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या काळात ९५ हजारांपेक्षा अधिक लोक फसवणुकीचे शिकार झाले. गेल्या तीन वर्षांमध्ये हा आकडा अडीच लाखांहून अधिक आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने संसदेत ही माहिती दिली.

केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, यूपीआय व्यवहार करताना फसवणुकीला बळी पडणाऱ्या नागरिकांची संख्या मागील तीन वर्षांपासून वाढत आहे. भारतात डिजिटल अदायगीत फसवणुकीच्या घटना वाढत चालल्याबद्दल राज्यसभा सदस्य कार्तिकेय शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरला केंद्रीय वित्त मंत्रालयाने ही आकडेवारी सादर केली. 

परदेशातही यूपीआयला मान्यता भारतीय डिजिटल अदायगी प्रणालीला जागतिक स्वीकृती मिळाली आहे. सिंगापूर, यूएई, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान यांसारख्या देशांनी भारताची प्रणाली स्वीकारली आहे.
 

Web Title: Be careful while transacting through UPI, more than 95 thousand people are victims of fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.