Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदरवाढीसाठी तयार राहा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वक्तव्य, शेअर बाजारांना  बसणार धक्का

व्याजदरवाढीसाठी तयार राहा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वक्तव्य, शेअर बाजारांना  बसणार धक्का

२५ जानेवारी रोजी जागतिक कर्जदाता संस्थेकडून नवीन जागतिक आर्थिक अंदाज जारी केला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:02 AM2022-01-22T06:02:16+5:302022-01-22T06:02:37+5:30

२५ जानेवारी रोजी जागतिक कर्जदाता संस्थेकडून नवीन जागतिक आर्थिक अंदाज जारी केला जाणार आहे.

Be prepared for interest rate hikes says International Monetary Fund | व्याजदरवाढीसाठी तयार राहा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वक्तव्य, शेअर बाजारांना  बसणार धक्का

व्याजदरवाढीसाठी तयार राहा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे वक्तव्य, शेअर बाजारांना  बसणार धक्का

वॉशिंग्टन : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून होणाऱ्या संभाव्य व्याजदरवाढीस उगवत्या अर्थव्यवस्थांनी तयार राहावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले आहे. नाणेनिधीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील मजबूत वृद्धी कायम राहण्याची शक्यता आहे. २५ जानेवारी रोजी जागतिक कर्जदाता संस्थेकडून नवीन जागतिक आर्थिक अंदाज जारी केला जाणार आहे.

नाणेनिधीने म्हटले की, अमेरिकेचे आर्थिक धोरण कडक होण्याची शक्यता आहे. त्याचा उगवत्या अर्थव्यवस्थांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. वित्तीय खर्चातील वाढीचा परिणाम विदेशी मागणीमुळे सौम्य होऊ शकतो. अमेरिकेतील वेतनातील वाढ अथवा पुरवठ्यातील सातत्याने येणारे अडथळे यामुळे किमती अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकतात. त्यातून महागाईचा दर अधिक वेगाने वर चढेल. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेकडून व्याजदर वाढीलाही गती दिली जाऊ शकते. त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक धक्क्यास उगवत्या अर्थव्यवस्थांनी तयार राहायला हवे.

फेडरल रिझर्व्ह मार्चमध्ये व्याजदरवाढ करू शकते. तसे झाल्यास आधीच्या अपेक्षेच्या एक महिना आधीच व्याजदरात वाढ होईल. विशेष म्हणजे फेडरल रिझर्व्ह आता चांगल्या स्थितीत असून, महागाईच्या विरोधात आणखी आक्रमक उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
 

Web Title: Be prepared for interest rate hikes says International Monetary Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.