मार्केट A 2 Z/ भाग-१५
शेअर बाजारात अनेकवेळा अनुभवले असेलच की विक्रीच्या माऱ्याने बाजार खाली येतो. याला अनेक कारणे असतात; परंतु, असा पॅनिक सेल म्हणजेच घाबरून जेव्हा मोठ्या प्रमाणात विक्री होत असते तेव्हा अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली येतात. चाणाक्ष गुंतवणूकदार याची वाटच पाहत असतो आणि या संधीचा अचूक फायदा घेत असतो. नव्याने एंट्री करणे किंवा चांगल्या शेअर्समध्ये भावात ॲव्हरेजिंग करण्यासाठी पॅनिक सेलचा उपयोग होत असतो. गुंतवणुकीसाठी जमा केलेली काही रक्कम अशा संधीचे सोने करण्यासाठी अवश्य बाजूला काढून ठेवा. आज इंग्रजी अक्षर ‘P’ पासून सुरू होणाऱ्या चांगल्या कंपन्यांविषयी...
पीडिलाइट इंडस्ट्रीज लि. (PIDILITIND)
फेविकॉल, फिक्स-इट, एम-सील, फेविक्रील असे नामवंत ब्रॅण्ड्सचे उत्पादन आणि विक्री हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय. केमिकल क्षेत्रात मोडणारी ही कंपनी अनेक वर्षांपासून भारतात कार्यरत आहे.
फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. २,५२२/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु. १ लाख २८ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. २,९१९/- आणि
लो रु. १,९८८/-, बोनस शेअर्स : सन १९९६ ते २०१० दरम्यान एकूण तीन वेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिट : १:१० या प्रमाणात सन २०१५ मध्ये
डिव्हिडंड : भागधारकांना मागील डिव्हीडंड रु. १०/- प्रति शेअर या प्रमाणात दिला आहे.
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत तब्बल दहापट रिटर्न्स
मिळाले आहेत.
भविष्यात संधी : यांच्या ब्रॅण्ड्सला स्पर्धा करतील असे इतर ब्रॅण्ड्स बाजारात उपलब्ध नाहीत. अत्यंत गरजेची उत्पादने असल्याने कंपनीस उत्तम भवितव्य आहे.
पर्सिस्टंट सीस्टिम्स लि. (PERSISTENT)
आयटी सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक उभरती कंपनी. क्लाउड, डेटा, परकीय चलन, अनॅलिटीक्स इत्यादी विभागात आयटी सेवा प्रदान करणे हा कंपनीचा
प्रमुख व्यवसाय. कंपनी भारत आणि अमेरिकेत सेवा प्रदान करते.
फेस व्हॅल्यू : रु. १०/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. २,८५२/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु. ३० हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. ४,९५४/-
आणि लो- रु. ३,०९२/-
बोनस शेअर्स : मार्च २०१५ मध्ये १:१ या प्रमाणात
शेअर स्प्लिट : अद्याप नाही
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल १३ पट रिटर्न्स
मिळाले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
मागील डिव्हीडंड प्रति शेअर रु. ११/-
भविष्यात संधी : आयटी क्षेत्रास भविष्यात उत्तम वाव आहे. कंपनीने गेल्या तीन चार वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. प्रत्येक तीन महिन्यातून थोडे थोडे शेअर्स खरेदी करावे. भावात करेक्शनचा फायदा होऊ शकतो.
पॉलीकॅब इंडिया लि. (POLYCAB)
इलेक्ट्रिक वायर उत्पादन आणि विक्री हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय असून या व्यतिरिक्त पंखे, एलइडी दिवे, स्विचेस, सोलर उत्पादन अशीही उत्पादने आहेत.
फेस व्हॅल्यू : रु. १०/-
सध्याचा भाव : रु. २,६२०/- प्रति शेअर
भाव पातळी : वार्षिक हाय/लाे रु. ,०२५/- आणि
लो - २,०४३/-
बोनस शेअर्स : अद्याप नाही
शेअर स्प्लिट : अद्याप नाही
रिटर्न्स : गेल्या चार वर्षांत चारपट रिटर्न्स मिळाले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
मागील डिव्हीडंड रक्कम रु. १४/- प्रति शेअर.
भविष्यात संधी : उत्तम असेल. कंपनीची उत्पादने आवश्यक आणि गरजेची असल्याने मागणी वाढत राहील.
Pपासून सुरू होणारे इतर चांगले शेअर : प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया लि., पेज इंडस्ट्रीज, पीआय इंडस्ट्रीज इत्यादी.
टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.