Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाच्या भीतीमुळे अस्वलाची मजबूत पकड

कोरोनाच्या भीतीमुळे अस्वलाची मजबूत पकड

कोरोना व्हायरस हा जगभरामध्ये पसरत असल्याने अर्थव्यवस्थांना फटका बसण्याच्या भीतीमुळे जगभरातील शेअरबाजार घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:26 AM2020-03-02T04:26:05+5:302020-03-02T04:26:18+5:30

कोरोना व्हायरस हा जगभरामध्ये पसरत असल्याने अर्थव्यवस्थांना फटका बसण्याच्या भीतीमुळे जगभरातील शेअरबाजार घसरले.

The bear's grip firmly in fear of Corona | कोरोनाच्या भीतीमुळे अस्वलाची मजबूत पकड

कोरोनाच्या भीतीमुळे अस्वलाची मजबूत पकड

- प्रसाद गो. जोशी
कोरोना व्हायरस हा जगभरामध्ये पसरत असल्याने अर्थव्यवस्थांना फटका बसण्याच्या भीतीमुळे जगभरातील शेअरबाजार घसरले. बाजारांच्या घसरणीमुळे फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मुंबई शेअरबाजारात गतसप्ताहामध्ये निर्देशांक घसरतच गेला. सप्ताहाचा प्रारंभच मागील बंद निर्देशांकापेक्षा खाली आलेल्या निर्देशांकाने झाला. हा खुला निर्देशांकच सप्ताहातील उच्चांक ठरला. सेन्सेक्स आणि निफ्टीची सप्ताहामध्ये सुमारे ६ टक्क्यांनी घट झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांना त्याचा अधिक फटका बसून हे निर्देशांक ७ टक्क्यांनी खाली आले.
शुक्रवारी जाहीर झालेली आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीची एकूण देशांतर्गत उत्पादनाची आकडेवारीही फारशी समाधानकारक आलेली नाही. या तिमाहीत उत्पादनामध्ये ४.७ टक्के वाढ झाली असली तरी मागील वर्षी असलेल्या ५.६ टक्क्यांपेक्षा ती कमीच आहे. त्यातच मुडीज या आंतरराष्टÑीय पतमापन संस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज घटविल्याने जगभरातील गुंतवणूकदार चिंतेमध्ये पडले आहेत.
भारतीय चलन रुपयाचे घसरणारे मूल्य हीसुद्धा एक चिंतेची बाब आहे. रुपयाचे मूल्य घसरल्याने आयात आणखी महाग होणार आहे. गतसप्ताहामध्ये देशी वित्तीय संस्थांनी १५,९८५.८२ कोटी रुपयांची खरेदी केली, मात्र परकीय वित्त संस्थांनी ११,३६८.६७ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

>दृष्टिक्षेपात सप्ताह
निर्देशांक
सेन्सेक्स
निफ्टी
मिडकॅप
स्मॉलकॅप
बंद मूल्य
३८,२९७.२९
११,२०१.७५
१४,६००.०२
१३,७०९.०१
>बदल
-२८७२.८३
- ८७९.१०
-१०९४.३९
-१०३७.५१

Web Title: The bear's grip firmly in fear of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.