Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'रीचनेस' आता आपल्या 'बजेट'मध्ये; डिस्टेम्पर विसरा, स्वस्तात मस्त रंगांनी घर सजवा!

'रीचनेस' आता आपल्या 'बजेट'मध्ये; डिस्टेम्पर विसरा, स्वस्तात मस्त रंगांनी घर सजवा!

मध्यमवर्गीय घरांमध्ये रंगकाम करताना बऱ्याचदा डिस्टेम्परची निवड केली जाते. खिशाचा अंदाज घेऊन आपण रंग निवडतो. तडजोड करतो. अर्थातच, डिस्टेम्परची चमक काही काळच टिकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 12:36 PM2022-05-04T12:36:35+5:302022-05-04T12:37:36+5:30

मध्यमवर्गीय घरांमध्ये रंगकाम करताना बऱ्याचदा डिस्टेम्परची निवड केली जाते. खिशाचा अंदाज घेऊन आपण रंग निवडतो. तडजोड करतो. अर्थातच, डिस्टेम्परची चमक काही काळच टिकते.

Beautify your homes with richness of Asian Paints Tractor Sparc Emulsion and Asian Paints Ace Sparc Emulsion | 'रीचनेस' आता आपल्या 'बजेट'मध्ये; डिस्टेम्पर विसरा, स्वस्तात मस्त रंगांनी घर सजवा!

'रीचनेस' आता आपल्या 'बजेट'मध्ये; डिस्टेम्पर विसरा, स्वस्तात मस्त रंगांनी घर सजवा!

घर... प्रत्येकासाठी जिव्हाळ्याची गोष्ट... हक्काचं ठिकाण... मायेचं छत्र... कोरोना काळात तर या घराने सगळ्यांना मोठा आधार दिलाय. त्यामुळे त्याच्यासोबतचं नातं अधिकच घट्ट झालंय. स्वाभाविकच, आपल्याला आपलं घर प्रसन्न, टवटवीत, हसरं, उत्साही हवं असतं. त्यासाठी नात्यांचे बंध जसे महत्त्वाचे, तसेच भिंतींचे रंगही. हे रंग घरामध्ये वेगळंच चैतन्य, फ्रेशनेस आणि 'रीचनेस'ही आणतात. आता तुम्ही म्हणाल, या 'रीचनेस'साठी बराच खर्चही करावा लागतो, त्याचं काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर 'बजेट वाला पेन्ट'बद्दल तुम्ही माहिती करून घ्यायलाच हवी. स्वस्तात मस्त आणि केवळ दिखाऊ नव्हे तर टिकाऊ पेन्टची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.  

मध्यमवर्गीय घरांमध्ये रंगकाम करताना बऱ्याचदा डिस्टेम्परची निवड केली जाते. खरं तर, आपल्याला प्लास्टिक पेन्ट किंवा इमल्जन पेन्टच खुणावत असतात. पण, खिशाचा अंदाज घेऊन आपण रंग निवडतो. तडजोड करतो. अर्थातच, डिस्टेम्परची चमक काही काळच टिकते. तो रंग जसजसा उडत जातो, तसा आपलाही हिरमोड होऊ लागतो. 'छेः, तेव्हा प्लास्टिक पेन्टच लावून घ्यायला हवा होता' असं वाटू लागतं. ही 'घर घर की कहानी' ओळखूनच एशियन पेन्ट्स आपल्यासाठी घेऊन आली आहे, घरातल्या भिंतींसाठी  Asian Paints Tractor Sparc Emulsion आणि बाहेरच्या भिंतींसाठी Asian Paints Ace Sparc Emulsion. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी एशियन पेंट्सच्या संकेतस्थळावरून गृहकला बुक डाऊनलोड करू शकता.

घराचा रंग 'डिस्टेम्पर टू इमल्जन' असा अपग्रेड करताना आपल्या खिशावर जास्त भार पडणार नाही, याची पूर्ण काळजी एशियन पेन्ट्सनं घेतली आहे. उलट, आपला बराचसा खर्च Asian Paints Tractor Sparc Emulsion मुळे कमी होऊ शकतो. हा रंग दिल्यानंतर गृहसजावटीसाठी लागणारं अतिरिक्त साहित्य - म्हणजे पडदे, फ्लॉवर पॉट, फोटो फ्रेम हे सगळं घ्यायची आवश्यकता भासणार नाही. रंगांच्या उत्तम क्वालिटीमुळे घराला एक वेगळा शाही लुक येईल. हा रंगाची जादू - अर्थात त्याचा स्मूथनेस तुम्ही स्पर्शातून अनुभवू शकाल. 

खिशावर अतिरिक्त भाग पडू नये म्हणून अनेक जण डिस्टेम्पर किंवा लोकल पेंट्स वापरतात. 
Asian Paints Tractor Sparc Emulsion आणि Asian Paints Ace Sparc Emulsion हे दोन्ही रंग डिस्टेम्परच्या किंवा सिमेंट पेन्टच्या तुलनेत दीर्घकाळ टिकणारे आहेत. ऊन, वारा किंवा पावसाने ते उडून जात नाहीत. त्यामुळे कुठल्याही ऋतूत आपण निश्चिंत राहू शकतो. या रंगांच्या किमतीत परवडणाऱ्या तर आहेतच, सोबतच ते अनेक वर्षांपर्यंत नवेच दिसतात. त्यामुळे भिंतींचं नुकसान करणाऱ्या रंगांना गुड बाय म्हणा आणि Asian Paints Tractor Sparc Emulsion आणि Asian Paints Ace Sparc Emulsion वापरून भिंतींना गुळगुळीत आणि दीर्घकाळ टिकणारा फिनिश द्या. हे रंग लावल्यानंतर तुम्हीही नक्की म्हणाल, 'बजेट में लगे, हर शौक पूरा करें'

Web Title: Beautify your homes with richness of Asian Paints Tractor Sparc Emulsion and Asian Paints Ace Sparc Emulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.