Lokmat Money > बिझनेस न्यूज > 500 आणि 1000 च्या नोटांचा ढीग लागल्याने RBI हैराण

500 आणि 1000 च्या नोटांचा ढीग लागल्याने RBI हैराण

चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचा बंदोबस्त लावणं अजून आरबीयला जमलेलं नसून, जुन्या नोटांचा ढीग लागल्याने आरबीआयचा त्रास वाढला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 02:21 PM2017-03-07T14:21:35+5:302017-03-07T14:21:35+5:30

चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचा बंदोबस्त लावणं अजून आरबीयला जमलेलं नसून, जुन्या नोटांचा ढीग लागल्याने आरबीआयचा त्रास वाढला आहे

Because of the 500 and 1000 notes, RBI hints | 500 आणि 1000 च्या नोटांचा ढीग लागल्याने RBI हैराण

500 आणि 1000 च्या नोटांचा ढीग लागल्याने RBI हैराण

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन तुटवडा भरुन निघत असून परिस्थिती आता सामान्य झाली आहे. निर्णयाची घोषणा झाल्यानंतर सामान्यांना झालेला त्रास कमी झाला असला तरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोरील (आरबीआय) समस्या अजून संपलेल्या नाहीत. चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांचा बंदोबस्त लावणं अजून आरबीयला जमलेलं नसून, जुन्या नोटांचा ढीग लागल्याने आरबीआयचा त्रास वाढला आहे. 
 
आरबीआयसमोर एवढी एकच समस्या नसून गेल्या महिन्यात बँकेची श्रेडिंग मशीन तुटली आहे. ज्यामुळे जुन्या नोटा नष्ट करण्याचं काम धीम्या गतीने सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 15 दिवसांपुर्वी या मशीन दुरुस्त करण्यात आल्या असून नोटा नष्ट करण्याचं काम पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलं. 
 
'अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे लाखो नोटा जमा झाल्या आहेत, ज्यांना नष्ट करण्याचं काम अजून बाकी आहे. यासाठी खूप वेळ लागणार आहे', असं राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचे अधिकारी एसएम देसाई यांनी सांगितलं आहे.
आरबीआयने चलनातून बाद केलेल्या सर्व नोटा नष्ट करु न शकल्याने पुढील नोटीस जारी होईपर्यंत पैसे चलन पेटीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पण समस्या ही आहेकी बँकांना आपलं नव चलनही तिथेच जमा करायचं असतं, आणि अशा परिस्थितीत जुन्या नोटा ठेवायच्या कुठे हा प्रश्न आरबीआयसमोर उभा आहे. 
 
'आरबीआयने जुन्या नोटा नष्ट करण्याच्या कामात गती आणणं गरजेचं आहे. नवीन नोटा जारी होत असल्यान जुन्या नोटा स्टॉकमध्ये ठेवणं शक्य नाही', असं एका सरकारी बँकेच्या अधिका-याने सांगितलं आहे. कर्नाटकमध्ये जवळजवळ सर्वच 270 चलन तिजोरी जुन्या नोटांनी भरुन पडल्या आहेत. जुन्या नोटा नष्ट करण्यासाठी आरबीआयने सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत शिफ्ट सुरु केल्याचंही सुत्रांकडून कळलं आहे.
 

Web Title: Because of the 500 and 1000 notes, RBI hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.