अस्थिरता हा तर बाजाराचा स्थायी भाव आहे. खरे तर सुदृढ बाजाराचे हे लक्षण आहे. जेव्हा बाजार वर जातो तेव्हा त्यात करेक्शन येणे स्वाभाविक आहे. नफा वसुली केल्याशिवाय खिशात पैसे येणार कसे? त्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा ताण न घेता प्रत्यक्षात त्याची मजा घेता यायला हवी. अस्थिरतेचा फायदा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कसा घेता येईल हे पाहावे. या मालिकेत इंग्रजी अक्षर ‘A’ पासून आजपर्यंत जे जे शेअर्स सुचविले आहेत त्यापैकी काहींचे भाव खाली आलेले आहेत. हे सर्व शेअर्स फंडामेंटल चांगले असलेले असून, येणाऱ्या काही वर्षांत उत्तम परतावा देण्याची क्षमता राखतात. सर्व आर्टिकल्स epaper.lokmat.com या संकेतस्थळावर सोमवारच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये अर्थउद्योग पानावर उपलब्ध आहेत. उत्तम शेअर्स खाली आलेल्या भावात खरेदी करून पुढील काही वर्षे ठेवा. उत्तम रिटर्न्स मिळतील. आज इंग्रजी अक्षर V पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी...
विनाती ऑरगॅनिक लि. (VINATIORGA)
केमिकल क्षेत्रात मोडणारी ही कंपनी ऑरगॅनिक उत्पादनात सक्रिय आहे. स्पेशालिटी ऑरगॅनिक इंटरमिडीअरीज तयार करणे आणि विविध आस्थापनांना वितरित करणे हा प्रमुख व्यवसाय आहे.
फेस व्हॅल्यू : रुपये १/- प्रति शेअर
सध्याचा भाव : रु. १,८६६/- प्रति शेअर
मार्केट कॅप : रु. १९ हजार १०० कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. २,३७७ व लो रु. १,६७४
बोनस शेअर्स : १:२ या प्रमाणात २००७ मध्ये
शेअर स्प्लिट : २००९ आणि २०२० मध्ये दोनवेळा
डिव्हिडंड : रु ६.५० पैसे प्रती शेअर
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत तब्बल १८ पट रिटर्न्स मिळाले.
भविष्यात संधी : उत्तम आहे कारण व्यवसाय उत्तम आहे. दीर्घ काळात चांगले रिटर्न्स मिळू शकतात. रु १८०० ची पातळी तुटली तर भाव अजून खाली येऊ शकतो. यासाठी थोडी वाट पाहावी.
वरुण ब्रेव्हरीज लि (VBL)
पेप्सी या सॉफ्ट ड्रिंक्सचे सर्व ब्रॅण्ड्स भारतात वितरित करण्याचे कार्य ही कंपनी करते. याचबरोबर ट्रॉपिकांना हे फळांचे प्रोसेस केलेले ज्युसेस सुद्धा वितरित करते.
फेस व्हॅल्यू : रुपये १० /- प्रति शेअर
सध्याचा भाव : रु. १,१५५/- प्रति शेअर
मार्केट कॅप : रु. ७५ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु. १,४८२/-
आणि लो रु. ५४३/-
बोनस शेअर्स : २०१९, २१ आणि
२२ यावर्षी तीनवेळा दिले आहेत.
शेअर स्प्लिट : अद्याप नाही
डिव्हिडंड : रुपये २.५० पैसे मागील वर्षी
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत ८ पट रिटर्न्स मिळाले.
भविष्यात संधी : उत्तम राहील. सध्या शेअरचा भाव वाढलेला आहे. नव्याने एंट्रीसाठी भावात करेक्शन येण्याची थोडी वाट पाहावी.
pushkar.kulkarni@lokmat.com
Follow : ww.lokmat.com/author/pushkarkulkarni