Join us

मधमाशीपालन करून काही महिन्यात व्हा लखपती! सरकारही देतंय 90 टक्क्यांपर्यंत सबसिडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:06 PM

Business Idea : अधिकाधिक शेतकरी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळावेत यासाठी नाबार्डसोबत (NABARD) राष्ट्रीय मधमाशी मंडळ (NBB) देखील मधमाशी पालनासाठी आर्थिक मदत पुरवते.

मधाचा वापर औषधापासून ते खाण्यापिण्यापर्यंत केला जातो. बाजारात मधाचे दरही चांगले आहेत. देश-विदेशातही मागणी खूप आहे. यामुळेच अनेक शेतकऱ्यांचा पारंपारिक शेती सोडून मधमाशीपालन व्यवसाय करण्याकडे कल वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारही आपल्या स्तरावर मदत करते.

मधमाशीपालन विकास नावाची योजना कृषी आणि कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत देखील चालवली जाते. मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण घेणे आणि जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दरम्यान, मध आणि मेणाशिवाय मधमाशीपालनातून अनेक गोष्टी बनवल्या जातात. यामुळे मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा मधमाशी डिंक, मधमाशी पराग यांसारखी उत्पादने घेतली जातात. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे.

अधिकाधिक शेतकरी मधमाशीपालन व्यवसायाकडे वळावेत यासाठी नाबार्डसोबत (NABARD) राष्ट्रीय मधमाशी मंडळ (NBB) देखील मधमाशी पालनासाठी आर्थिक मदत पुरवते. राष्ट्रीय मधमाशी मंडळ हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान देते.

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही 10 बॉक्स घेऊन देखील मधमाशी पालन करू शकता. एका बॉक्समध्ये 40 किलो मध आढळल्यास एकूण मध 400 किलो होईल. 350 रुपये प्रति किलो दराने 400 किलो विकल्यास 1.40 लाख रुपये मिळतील. जर प्रति बॉक्सचा खर्च 3500 रुपये आला तर एकूण खर्च 35,000 रुपये आणि निव्वळ नफा 1,05,000 रुपये होईल. मधमाशांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय दरवर्षी 3 पटीने वाढतो. म्हणजेच 10 बॉक्सपासून सुरू केलेला व्यवसाय एका वर्षात 25 ते 30 बॉक्स होऊ शकतो.

टॅग्स :व्यवसाय