Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील 'या' राज्यांमध्ये बिअरची जबरदस्त विक्री; नेमकं कारण काय? वाचा

देशातील 'या' राज्यांमध्ये बिअरची जबरदस्त विक्री; नेमकं कारण काय? वाचा

beer sale: देशभरातील अनेक राज्यांमध्ये बिअरची विक्री अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:14 PM2021-03-29T16:14:34+5:302021-03-29T16:17:47+5:30

beer sale: देशभरातील अनेक राज्यांमध्ये बिअरची विक्री अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे.

beer sales got boosts after state excise policies | देशातील 'या' राज्यांमध्ये बिअरची जबरदस्त विक्री; नेमकं कारण काय? वाचा

देशातील 'या' राज्यांमध्ये बिअरची जबरदस्त विक्री; नेमकं कारण काय? वाचा

Highlightsदेशातील अनेक राज्यांमध्ये बिअर विक्रीत मोठी वाढमहसुलातील तूट भरून काढण्यासाठी राज्यांमध्ये नियमांत बदलकोरोना संकटातही बिअर उद्योगासाठी सकारात्मक बाब

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे गतवर्षी अनेक उद्योग, व्यवसाय यांच्यावर कठीण काळ ओढावला होता. मात्र, त्यानंतर हळूहळू देशभरातील अनेक क्षेत्रांमध्ये उलाढालींचे प्रमाण वाढू लागले. खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे थैमान सुरू झाले असून, देशात चिंतेचे वातावरण आहे. अशातच देशभरातील अनेक राज्यांमध्ये बिअरची विक्री अनेकपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. (beer sale got boosts after state excise policies)

बिअरची वाढलेली विक्री ही बिअर उद्योगासाठी चांगली ठरत असल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षीच्या कोरोना संकटामुळे बिअर उद्योगावर मोठा परिणाम झाला होता. बिअरची विक्री मोठ्या प्रमाणावर मंदावली होती. मात्र, अलीकडेच देशातील अनेक राज्यांनी महसुलात होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी उत्पादन शुक्ल धोरणात बदल केले आहेत. याचा बिअर उद्योगावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; दर प्रति तोळा १२ हजार रुपयांनी झाला कमी

पश्चिम बंगालमध्ये बिअर उद्योगात ५० टक्के वाढ

देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमध्ये बिअर उद्योग ५० टक्के दराने वाढत आहे. ड्युटी स्ट्रक्चरमध्ये बदल केल्यामुळे किंमती कमी होत आहेत. उत्तरेकडील राज्ये आणि दक्षिण भारतातील संसर्ग दर कमी झाला आहे. तसेच करांच्या अनुकूलतेमुळे कोरोना काळातील बिअर विक्री २०१९ च्या पातळीवर पोहोचेल, असा विश्वास भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे अध्यक्ष एबी इनबेवचे अध्यक्ष कार्तिकेय शर्मा यांनी व्यक्त केला आहे. 

घाऊक आणि किरकोळ मार्जिनमध्ये वाढ

उत्तर प्रदेशात ५०० मिली बिअयर कॅनचे उत्पादन शुल्क ७० टक्के आहे. त्यात आता सुमारे एक तृतीयांश घट झाली आहे. तसेच घाऊक व किरकोळ मार्जिनही वाढले आहेत. किरकोळ परवान्याच्या नूतनीकरणासाठी फी वाढवण्याचा प्रस्तावही राज्याने प्रस्तावित केलेला नाही. त्यामुळे बिअरची विक्री वाढल्याचे सांगितले जात आहे. 

LIC IPO तून १ लाख कोटी व BPCL मधून ८० हजार कोटींची कमाई; केंद्र सरकारला विश्वास

कोरोना उपकर माफ केल्याचा परिणाम

प्रत्येक तिमाहीत विक्रीत वाढ झाली आहे. कोरोना उपकर माफ केलेल्या राज्यांमध्ये विक्रीत सुधारणा झाली आहे. देशातील सर्वांत मोठ्या बिअर मार्केटपैकी एक असलेल्या राजस्थानमध्ये भारतात बनवलेल्या परदेशी मद्यावरील शुल्कात वाढ जाहीर केल्याने बिअरची विक्री वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राजस्थानमध्ये बनवलेल्या दारूला चालना देण्यासाठी काही पावले उचलली आहेत, अशी माहिती एका बिअर कंपनीच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, दिल्लीत बिअर खरेदी करण्यासाठीची वयोमर्यादा कमी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशने वैयक्तिक बार परमिटची व्यवस्था केली आहे. देशातील काही भागात बिअरवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे बिअरच्या वापरास वेग येईल, असे म्हटले जात आहे. 

Web Title: beer sales got boosts after state excise policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.